मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज त्यांच्या सर्वसमावेशक वॉरंटी आणि ऑडी रोडसाइड असिस्टन्स प्रोग्रामची घोषणा केली, जेथे ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओमध्ये उद्योग-अग्रणी १०-वर्ष विस्तारित वॉरंटी आणि १५-वर्ष रोडसाइड असिस्टन्स सेवा देण्यात येत आहे. नवीन विस्तारित वॉरंटी प्रोग्राम ग्राहकांना वेईकलच्या उत्पादन तारखेपासून जवळपास १० वर्षांपर्यंत सर्वसमावेशक कव्हरेज देतो. विस्तारित वॉरंटी मूल्यवर्धित पर्याय म्हणून उपलब्ध आहे, जो ग्राहकांना अपवादात्मक अनुभव देण्याप्रती आणि भारतातील लक्झरी ऑटोमोटिव्ह विभागाला प्रगत करण्याप्रती ऑडीची सातत्यपूर्ण कटिबद्धता अधिक दृढ करतो.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ”ऑडी इंडियामध्ये आमचा विश्वास आहे की, ग्राहकांसोबतचे आमचे नाते खरेदीच्या पुढे देखील कायम राहते. आमचे विस्तारित वॉरंटी व ऑडी रोडसाइड असिस्टन्स प्रोग्राम ग्राहक समाधानाप्रती आमच्या अविरत कटिबद्धतेचे विस्तारीकरण आहेत आणि भारतातील लक्झरी ऑटोमोटिव्ह सेवेसाठी नवीन उद्योग मानक स्थापित करतात. १०-वर्ष विस्तारित वॉरंटी आणि १५-वर्ष रोडसाइड असिस्टन्ससह आमचा ग्राहकांना अद्वितीय मन:शांती देण्याचा मनसुबा आहे, जेथे नेहमी साह्य उपलब्ध असण्याची खात्री मिळते.”
नवीन विस्तारित वॉरंटी प्रोग्राम ग्राहकांना वेईकलच्या उत्पादन तारखेपासून जवळपास १० वर्षांपर्यंत सर्वसमावेशक कव्हरेज देतो. ग्राहक प्रमाणित उत्पादक वॉरंटीशी समान असलेल्या कव्हरेज अटींसह १-वर्ष आणि २-वर्ष विस्तारीकरणामधून निवड करू शकतात. हा प्रोग्राम १० वर्षांपर्यंतच्या वेईकल्ससाठी सर्व उत्पादन दोषांना कव्हर करतो, ज्यामध्ये २००,००० किलोमीटरपर्यंत मायलेज संरक्षण आहे. ही वॉरंटी भारतातील सर्व ऑडी उत्पादनांवर उपलब्ध आहे आणि स्थिर खरेदी पर्याय देते, ज्यामुळे ग्राहकांना नवीन कार डिलिव्हरीच्या वेळी किंवा विद्यमान वॉरंटी समाप्त होण्यापूर्वी कव्हरेज मिळू शकते.
तसेच, ऑडी रोडसाइड असिस्टन्स प्रोग्राम आता अद्वितीय १५-वर्ष रोडसाइड असिस्टन्स पर्याय देतो. हा प्रोग्राम भारतातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व मुख्य शहरांमधील रस्त्यांवर सर्वसमावेशक २४/७ आपत्कालीन रोडसाइड असिस्टन्स सेवा देतो. रोडसाइड असिस्टन्स प्रोग्राम विविध वैधता कालावधी व वेईकलच्या वयानुसार ३,९९९ रूपये ते ८,००० रूपयांपर्यंत स्थिर कव्हरेज पर्याय देतो.
विस्तारित वॉरंटी कव्हरेजमध्ये जवळपास १० वर्षांपर्यंतच्या वेईकल्ससाठी सर्व उत्पाादन दोष कव्हर करण्यात येतात. व्यापक मायलेज संरक्षणासह जवळपास २००,००० किलोमीटरपर्यंत कव्हरेज मिळते. भारतातील सर्व ऑडी मॉडेल्सवर ही सुविधा उपलब्ध असेल. ग्राहकांना नवीन कारची डिलिव्हरी करताना किंवा विद्यमान वॉरंटी समाप्त होण्यापूर्वी निवड करता येऊ शकते.
ऑडी रोडसाइड असिस्टन्स प्रोग्राममध्ये भारतातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि मुख्य शहरांमधील रस्त्यांवर आपत्कालीन ब्रेकडाऊन सपोर्ट, ब्रेकडाऊन, अपघात झाल्यास किंवा वेईकल बंद पडल्यास जवळच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये घेऊन जाण्याची सुविधा, किरकोळ यांत्रिक आणि विद्युत दोषांसाठी त्वरित टेक्निकल सहाय्य आदी सेवा २४/७ उपलब्ध होतील.