सोमवार, जुलै 28, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

by Gautam Sancheti
जून 23, 2025 | 4:29 pm
in संमिश्र वार्ता
0
Audi India Q7 Signature Edition

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या फ्लॅगशिप एसयूव्‍हीची एक्‍सक्‍लुसिव्‍ह व्‍हर्जन ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच केली. या कारमध्‍ये प्रीमियम डिझाइन घटक आणि लक्‍झरीअस सुविधांचे सर्वोत्तम कलेक्‍शन आहे. सिग्‍नेचर एडिशन काळजीपूर्वक निवडलेल्‍या सुधारणांच्‍या माध्‍यमातून क्‍यू७ ची लक्षवेधक उपस्थिती वाढवते, ज्‍यामध्‍ये नाविन्‍यपूर्ण ऑडी रिंग्‍ज एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स आणि नाविन्‍यपूर्ण इस्‍प्रेसो मोबाइल इन-वेईकल कॉफी सिस्‍टम आहे. ९९,८१,००० रूपयांपासून (एक्‍स-शोरूम) किंमत सुरू होणारी ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन आपल्‍या मालकीच्‍या प्रीमियम एसयूव्‍हीमध्‍ये विशिष्‍टतेची मागणी करणाऱ्या ग्राहकांसाठी बीस्‍पोक लक्‍झरी अनुभव देण्‍याप्रती ऑडीच्‍या कटिबद्धतेला सादर करते.

ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन मर्यादित युनिट्समध्‍ये उपलब्‍ध आहे. ही कार साखीर गोल्‍ड, वेटोमो ब्‍ल्‍यू, मिथोस ब्‍लॅक, ग्‍लेशियर व्‍हाइट आणि समुराई ग्रे या पाच आकर्षक एक्‍स्‍टीरिअर रंगांमध्‍ये येते. ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, “ऑडी क्‍यू७ भारतातील लक्‍झरी एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये मापदंड स्‍थापित करत आहे, जेथे लक्षवेधक कार्यक्षमता आणि तडजोड न करणाऱ्या लक्‍झरीचे परिपूर्ण संयोजन देते. सिग्‍नेचर एडिशन विचारपूर्वक डिझाइन केलेल्‍या घटकांना सादर करत या वारसाला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. हे घटक मालकीहक्‍क अनुभव खास करतात. वैशिष्‍ट्यपूर्ण ऑडी रिंग्‍स प्रोजेक्‍शन लाइटपासून नाविन्‍यपूर्ण इस्प्रेसो मोबाइल सिस्‍टमपर्यंत प्रत्‍येक सुधारणा ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्‍यासाठी निवडण्‍यात आली आहे, जे त्‍यांच्‍या वेईकलकडे त्‍यांच्या सुधारित जीवनशैलीचे विस्‍तारीकरण म्‍हणून पाहतात आणि सर्वोत्तम ऑटोमोटिव्‍ह कारागिरीचे कौतुक करतात.”

सिग्‍नचेर एडिशनची वैशिष्‍ट्ये:
सिग्‍नचेर एडिशन पॅकेज ऑडी क्‍यू७ साठी बीस्‍पोक स्‍टायलिंग सुधारणा देते. हे विशेष पॅकेज विशिष्‍ट लुक देण्‍यासह पुढील वैशिष्‍ट्ये देते:

  • ऑडी रिंग्‍स एण्‍ट्री एलईडी लॅम्‍प्‍स, जे आकर्षक वेलकम लाइट प्रोजेक्‍शन निर्माण करतात (नवीन).
  • डायनॅमिक व्‍हील हब कॅप्‍स, जे चाक गतीमध्‍ये असताना देखील परिपूर्ण ऑडी लोगो ओरिएन्‍टेशन कायम ठेवतात (नवीन).
  • वेईकल अॅक्‍सेसकरिता प्रीमियम अनुभवासाठी मेटलिक की कव्‍हर (नवीन).
  • स्‍टेनलेस स्‍टील पेडल कव्‍हर्स स्‍पोर्टी इंटीरिअर अॅसेंटची भर करतात (नवीन).
  • अनपेक्षित इन-वेईकल पेय अनुभसाठी इस्‍प्रेसो मोबाइल कॉफी सिस्‍टम (नवीन).
  • ऑडी डॅशकॅमसह ऑडी युनिव्‍हर्सल ट्रॅफिक रेकॉर्डर ड्रायव्हिंग करताना आणि कार पार्क केली असताना अतिरिक्‍त संरक्षण देते (नवीन).
  • आकर्षक लुकसाठी नवीन आर२० अलॉई व्‍हील्‍सवर स्‍पेशल अलॉई व्‍हील पेंट डिझाइन (नवीन).

ऑडी क्‍यू७ ची इतर वैशिष्‍ट्ये:

  • शक्तिशाली ३.० लिटर व्‍ही६ टीएफएसआय इंजिनची शक्‍ती, जे ३४० एचपी शक्‍ती आणि ५०० एनएम टॉर्क देते, सोबत उच्‍च दर्जाचे परफॉर्मन्‍स व कार्यक्षमतेसाठी ४८ व्‍होल्‍ड माइल्‍ड हायबिड तंत्रज्ञान.
  • फक्‍त ५.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते, टॉप स्‍पीड २५० किमी/तास आहे, ज्‍यामधून कारची प्रभावी परफॉर्मन्‍स क्षमता दिसून येते.
  • सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्‍ये उच्‍च दर्जाचे घर्षण व स्थिरतेसाठी क्‍वॉट्रो परमनण्‍ट ऑल-व्‍हील ड्राइव्‍ह.
  • वैविध्‍यपूर्ण ड्रायव्हिंग अनुभवासाठी अॅडप्टिव्‍ह एअर सस्‍पेंशन आणि ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍टसह ७ ड्रायव्हिंग मोड्स, तसेच ऑफ-रोड मोड आहे.
  • विनासायास पॉवर डिलिव्‍हरीसाठी सहजपणे शिफ्ट होणारे एट-स्‍पीड टिप्‍ट्रॉनिक ट्रान्‍समिशन.
  • सात-आसनी कन्फिग्‍युरेशनसह अधिक वैविध्‍यतेसाठी इलेक्ट्रिकली फोल्‍डेबल थर्ड-रो सीट्स.
  • ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस पूर्णत: डिजिटल व कस्‍टमायझेबल इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर देते.
  • सर्वोत्तम ऑडिओ अनुभवासाठी बँग अँड ओलुफ्सेन प्रीमियम ३डी साऊंड सिस्‍टमसह १९ स्‍पीकर्स आणि ७३० वॅट्स आऊटपुट.
  • वेईकल फंक्‍शन्‍सवर सर्वोत्तम नियंत्रणासाठी एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह टच प्रतिसाद.
  • सोईस्‍कर कनेक्‍टीव्‍हीटीसाठी ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग.
  • प्रभावी पार्किंग आणि अधिक सुरक्षिततेसाठी पार्क असिस्‍ट प्‍लससह ३६०-डिग्री कॅमेरा.
  • सोईस्‍कर अॅक्‍सेससाठी कम्‍फर्ट कीसह सेन्‍सर-नियंत्रित बूट लिड ऑपरेशन.
  • प्रीमियम केबिन अनुभवासाठी ४-झोन क्‍लायमेट कंट्रोलसह एअर आयोनायझर आणि अरोमॅटायझेशन.
  • प्रतिकूल हवामान स्थितींमध्‍ये सुधारित दृश्‍यमानतेसाठी अॅडप्टिव्‍ह विंडस्क्रिन वायपर्ससह एकीकृत वॉश नोझल्‍स.
  • नकळतपणे लेन बदलण्‍याला प्रतिबंध करण्‍यास मदत करण्‍यासाठी लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्‍टम.
  • अधिक संरक्षणासाठी संपूर्ण केबिनमध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या बसवलेल्‍या आठ एअरबॅग्‍ज.
  • सुधारित वेईकल स्थिरता व नियंत्रणासाठी इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलायझेशन प्रोग्राम.
    ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन विशेषत: टेक्‍नॉलॉजी व्‍हेरिएण्‍टसह येते आणि सिग्‍नेचर एडिशनमधील विशेष वैशिष्‍ट्ये ऑडी जेन्‍यूएन अॅक्‍सेसरीजचा भाग आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

Next Post

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

Untitled 55

शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट…अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहार प्रकरणाची पत्राव्दारे दिली माहिती

जुलै 28, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरुच…वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये अडीच लाखाचा ऐवज चोरीला

जुलै 28, 2025
Untitled 54

पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणारे दोन दहशवादी ठार

जुलै 28, 2025
rohini khadse e1712517931481

रोहिणी खडसे यांची पतीच्या अटकेवर २४ तासानंतर पहिली प्रतिक्रिया….

जुलै 28, 2025
Gw3d92jXUAErPq5

महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची निवड

जुलै 28, 2025
cbi

सायबर फसवणूक करणाऱ्या संघटीत टोळीविरुद्ध सीबीआयची मोठी कारवाई ; तिघांना अटक

जुलै 28, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011