मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतामध्ये आयकॉनिक ऑडी क्यू७ च्या लाँचची घोषणा केली. कार्यक्षमता, स्टाइल, आरामदायीपणा व ड्रायव्हिंग क्षमतेचे परिपूर्ण संयोजन असलेल्या नवीन ऑडी क्यू७ मध्ये गतीशील ३.० लिटर व्ही६ टीएफएसआय इंजिन आहे. या मोठ्या एसयूव्हीमध्ये ऑडी ‘क्यू’ समूहाची नवीन डिझाइन असण्यासोबत उच्च गतीशीलता व सर्वोत्तम आरामदायीपणा आहे. तसेच या कारमध्ये अधिक एैसपैस जागा व वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये देखील आहेत. ऑडी क्यू७ प्रिमिअम प्लस व्हेरिएण्ट रुपये ७९ लाख ९९ हजार रुपये (एक्स-शोरूम) तर ऑडी क्यू७ टेक्नोलॉजी व्हेरिएण्ट रुपये ८८ लाख ३३ हजार रुपये (एक्स-शोरूम) मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “भारतातील अत्यंत लोकप्रिय ठरलेली कार लाँच करत वर्षाचा शुभारंभ करण्यासारखा दुसरा सर्वोत्तम मार्ग कोणताच नाही. ऑडी क्यू७ अनेक वर्षांपासून आमच्या क्यू-रेंजची आयकॉन राहिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन लुक व अद्ययावत वैशिष्ट्यांनी युक्त नवीन मॉडेल ट्रेलब्लेझर ठरेल. ऑडी क्यू७ ची ऑन-रोड व ऑफ-रोड वैविध्यपूर्ण कार्यक्षमता प्रमुख पैलू आहे, जो कारला इतरांपेक्षा वरचढ ठरवतो. वर्ष २०२२ मध्ये उच्च आकारमानाच्या मॉडेल्ससोबत काही उच्चस्तरीय उत्पादने लाँच करण्यात येतील. वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओसह आम्ही वर्ष २०२२ दरम्यान प्रबळ विक्री कामगिरी करण्यास उत्सुक आहोत. अधिक सोयीसुविधा सादर केल्या जाणार आहेत आणि आज ऑडी इंडियासाठी आणखी एका उत्तम वर्षाची सुरूवात आहे.”
अशी आहेत या कारची वैशिष्ट्ये
– ३.० लिटर व्ही६ टीएफएसआयसह ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टिम ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्कची निर्मिती करते.
– माइल्ड हायब्रिडमध्ये ४८-व्होल्ट इलेक्ट्रिकल सिस्टिम आहे, जी बेल्ट अल्टरनेट स्टार्टरला (बीएएस) पुरेशी शक्ती देते. ही सिस्टिम इंजिनला कोस्टिंगच्या वेळी जवळपास ४० सेकंदांपर्यंत बंद ठेवते. बीएएस सिस्टिम मागणीनुसार आपोआपपणे वेईकल पुन्हा सुरू करते.
– २५० किमी/तास या अव्वल गतीसह ऑडी क्यू७ ५.९ सेकंदांमध्ये ०-१०० किमी/तास गती प्राप्त करते.
– दिग्गज क्वॉट्रो ऑल-व्हिल ड्राइव्ह, अॅडप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि ऑडी ड्राइव्ह सिलेक्टसह सात ड्राइव्ह मोड्सच्या (ऑटो, कम्फर्ट, डायनॅमिक, एफिशिएन्सी, ऑफरोड, ऑल-रोड व इंडिव्हिज्युअल) परिपूर्ण संयोजनासह ऑडी क्यू७ अद्वितीय ड्राइव्ह अनुभव देते.
एक्स्टीरिअर:
– पुढील बाजूस नवीन बम्पर आणि उच्च एअर इनलेट्ससह प्रबळ त्रिमिती इफेक्ट
– फ्लॅट, वाइडर लुकिंग सिंगल फ्रेम ग्रिलसह ऑक्टगोनल आऊटलाइन आणि नवीन सिल ट्रिम, जे स्टान्स अधिक वाढवते.
– मॅट्रिक्स एलईडी हेडलॅम्प्ससह सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी टेललॅम्प्ससह डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स ड्रायव्हिंगच्या वेळी सुस्पष्ट दृश्यमानतेची खात्री देतात.
– पॅनोरॅमिक सनरूफ
– हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
– अॅडप्टिव्ह विंडशील्ड वायपर्ससह इंटीग्रेटेड वॉशर नोझल्स
– ऑडी क्यू७ ची प्रबळ डिझाइनशैली आकर्षक ४८.२६ सेमी (आर१९) ५-आर्म स्टार स्टाइल डिझाइन अलॉइ व्हील्ससह अधिक आकर्षक करण्यात आली आहे.
– पाच एक्स्टीरिअर रंगांमध्ये उपलब्ध – कॅरेरा व्हाइट, मायथॉस ब्लॅक, नवेरा ब्ल्यू, समुराई ग्रे आणि फ्लोरेट सिल्व्हर.
– दोन इंटीरिअर रंगांमध्ये उपलब्ध – सेगा बीज आणि ओकापी ब्राऊन.
इंटीरिअर:
– इंटीरिअरमध्ये सुलभ एर्गोनॉमिक्स व उत्तम हाताळणीसाठी कॉकपीट डिझाइनभोवती ड्रायव्हर-केंद्रित रॅप आहे.
– कॉकपीट आर्किटेक्चर परिपूर्णरित्या नवीन, डिजिटल ऑपरेटिंग कन्सेप्टमध्ये सामावून जाते, ज्यामध्ये दोन मोठ्या टचस्क्रीन्स आहेत.
– पृष्ठभाग व कॉन्टर लायटिंगसाठी प्रत्येकी ३० रंगांसह सानुकूल अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस
– सात आसनांसह ऑडी क्यू७ मध्ये दैनंदिन वापरासाठी प्रचंड प्रतिष्ठा सामावलेली आहे.
इन्फोटेन्मेंट व कनेक्टीव्हीटी:-
– ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट व ऑडी स्मार्टफोन इंटरफेस (अॅप्पल कारप्ले व अँड्रॉईड ऑटो) यांसारखी स्मार्ट वैशिष्ट्ये असलेली ऑडी क्यू७ विविध इन्फोटेन्मेंट पर्याय देते.
– एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच रिस्पॉन्स – नेव्हिगेशन, तसेच हाय-रिझॉल्युशन २५.६५ सेमी (१०.१ इंच) कलर डिस्प्ले
– एअर कंडिशनिंग, फेवरेट्स व शॉर्टकट्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिमोट एमएमआय टच कंट्रोल पॅनेलसह २१.८४ सेमी (८.६ इंच) कलर डिस्प्ले
– बीअॅण्डओ प्रिमिअम ३डी साऊंड सिस्टिम – १९ स्पीकर्ससोबत ३डी स्पीकर, सेंटर स्पीकर व सबवूफरच्या माध्यमातून साऊंउ प्लेबॅक, ७३० वॅट्स एकूण पॉवर आऊटपुट असलेले १६-चॅनेल अॅम्प्लिफायर
– ऑडी क्यू७ मध्ये बिल्ट-इन तरतूदींसह रिअर सीट एंटरटेन्मेंट देखील आहे. ऑडी एंटरटेन्मेंट मोबाइल (रिअर सीट एंटरटेन्मेंट स्क्रिन्स) ऑडी जेन्यूएन अॅक्सेसरीजच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. स्क्रीन्स ऑडी क्यू७ च्या बीअॅण्डओ प्रिमिअम साऊंड सिस्टिमसह ३डी साऊंडशी एकीकृत आहेत.
आरामदायीपणा व सुरक्षितता:
– जेन्यूएन क्रिकेट लेदर अपहोल्स्टरी
– पुढील बाजूस कम्फर्ट सेंटर आर्मरेस्ट
– प्रबळ फ्रण्ट सीट्ससह ड्रायव्हरच्या बाजूला मेमरी फंक्शन
– दुस-या रांगेमध्ये समायोजित होण्यासोबत मागे-पुढे होणारी आणि मागे वाकणारी आसने
– ७-आसनीसह तिस-या रांगेमध्ये इलेक्ट्रिकली फोल्डेबल आसने
– फ्रेश केबिनमध्ये एअर आयोनायझर व अरोमाटायझेशनच्या माध्यमातून ४-झोन एअर कंडिशनिंगच्या संयोजनाची खात्री मिळते.
– कीलेस प्रवेशासाठी कम्फर्ट की आणि इलेक्ट्रिक बूट लिडसह गेस्चर बेस्ड ऑपरेशन
– क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर, पार्क असिस्ट प्लससह ३०६ अंश कॅमेरा व लेन डिपार्चर वॉर्निंगसह स्टिअरिंग असिस्ट ड्रायव्हरला साह्य करण्यासोबत सोयी सुविधा देतात
– अधिक सुरक्षिततेसाठी ८ एअरबॅग्ज
फायदे:-
– प्रमाणित २ वर्षांची वॉरंटी, जी जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
– ५ वर्षांचे रोडसाइड असिस्टण्स (आरएसए), जे जवळपास १० वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकते.
-ग्राहक खरेदीच्या तारखेपासून जवळपास ७ वर्षांपर्यंत बेसिक व कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्विस प्लान खरेदी करू शकतात.
डिजिटायझेशन:-
– ‘माय ऑडी कनेक्ट’ अॅप नवीन क्यू७ सह पूर्णत: सुसंगत आहे.
– व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेण्टेड रिअॅलिटी व प्रॉडक्ट व्हिज्युअलायझर एक्स्परिअन्स उपलब्ध
– नवीन क्यू७ मधील अॅक्सेसरीजसाठी ऑडी शॉपमध्ये विशेष सेक्शन