गुरूवार, सप्टेंबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘ऑडी क्यू५’ लॉन्च: या आलिशान कारची किंमत आहे एवढी आणि खासियत…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 23, 2021 | 3:44 pm
in राज्य
0
Mr. Balbir Singh Dhillon with the new Audi Q5

मुंबई – ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू५च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू५ नेहमीच तिचे आकारमान, कामगिरी व उपकरणे यांच्या अचूक मिलाफासाठी प्रसिद्ध राहिली आहे. या अत्यंत यशस्वी मॉडेलच्या बाह्यरचनेला एक धारदार स्वरूप दिल्यामुळे क्यूची ओळख अधोरेखित झाली आहे आणि क्वात्रोची अंगभूत वैशिष्ट्ये त्यात सामावली गेली आहेत.

ऑडी क्यू५ मध्ये, २४९ हॉर्सपॉवर ऊर्जा व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर टीएफएसआय इंजिनची शक्ती आहे. औरंगाबादमधील एसएव्हीडब्ल्यूआयपीएल कारखान्यात तयार झालेली ऑडी क्यू५ प्रीमियम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून यांची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे ५८,९३,०००/- रुपये आणि ६३,७७,०००/- रुपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीरसिंग धिल्लन या लाँचबद्दल म्हणाले, “आज आम्ही २०२१ मधील आमचे ९वे उत्पादन बाजारात आणले आहे आणि याहून अधिक आनंदी आम्ही असूच शकत नाही. ऑडी क्यू५ अगदी पूर्वीपासून आमच्या सर्वाधिक विक्रीच्या गाड्यांपैकी एक आहे आणि हे मॉडेलही अशीच कामगिरी करेल, याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. अतिरिक्त सुधारणांच्या माध्यमातून ऑडी क्यू५ मध्ये लग्झरी, स्पोर्टीनेस, आराम आणि दैनंदिन वापरासाठी योग्यता यांचा अचूक संयोग साधण्यात आला आहे.”

श्री. धिल्लन पुढे म्हणाले, “२०२१ हे वर्ष ऑडी इंडियासाठी उत्तम राहिले आहे. आमची विक्री वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात १०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे आणि ऑडी क्यू५ बाजारात आल्यामुळे ही वाढ आणखी पुढे जाईल, असा आत्मविश्वास आम्हाला वाटतो. या वर्षाची सांगता उच्च स्तरावर करण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत आणि आणखी काही महत्त्वाची मॉडेल्स २०२२ मध्ये बाजारात आणण्यासाठीही तयारी करत आहोत.”

असे आहेत फिचर्स
● २४९ हॉर्सपॉवर शक्‍ती व ३७० एनएम टॉर्क निर्माण करणाऱ्या २.० लिटर ४५ टीएफएसआय इंजिनची शक्ती ऑडी क्यू५ मध्ये आहे.
● कारचा वेग केवळ ६.३ सेकंदात शून्यावरून १०० किलोमीटरपर्यंत जातो आणि २३७ किलोमीटर प्रतितास एवढा सर्वोच्च वेग ती गाठू शकते.

● कार डॅम्पिंग नियंत्रणासह अडाप्टिव सस्पेन्शन देऊ करते.
● ऑडी ड्राइव्ह सिलेक्टच्या माध्यमातून ड्रायव्हर कंफर्ट, डायनॅमिक, इंडिव्हिज्युअल, ऑटो, एफिशिएन्सी आणि ऑफ-रोड या सहा मोड्समधून एकाची निवड करू शकतो.
● क्वात्रो फोर-व्हील ड्राइव्ह प्रणालीमुळे आव्हानात्मक भूप्रदेशांमध्ये सुयोग्य पकड मिळवण्यास मदत होते.

बाह्यरचना
● ऑडी क्यू५ च्या पुढील बाजूला ट्रेडमार्ड सिंगलफ्रेम ग्रिल अष्टकोनी आउटलाइनसह देण्यात आली आहे, ही रचना अधिक सुस्पष्ट आहे आणि यात कडा अधिक स्पष्ट दिसून येतात.
● ग्रिल व पट्ट्यांना क्रोम गार्निशेस आहेत, तर स्किड प्लेट्स, रूफ रेल्स आणि नवीन फॉगलॅम्प केसिंगला सिल्व्हर अक्सेंट्स देण्यात आले आहेत.

● ४८.२६ सेंटीमीटर (आर१९) अलॉय व्हील्स, रॅपअराउंड शोल्डर लाइन, एलईडी कॉम्बिनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि अॅल्युमिनिअम रूफ नेल्स यांच्या माध्यमातून गाडीचे बाह्यरूप अधिक चांगले करण्यात आले आहे.
● ऑडी क्यू५ पुढील पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे – नॅव्हारा ब्ल्यू, आयबिस व्हाइट, मायथोस ब्लॅक, फ्लोरेट सिल्व्हर आणि मॅनहटन ग्रे.

अंतर्गत रचना:
● नवीन ऑडी क्यू५ ची अंतर्गत रचना अटलास बेज व ओकापी ब्राउन रंगातील लेदर लेदरेट अपहोल्स्ट्रीने सजली आहे, तर इनलेजचे फिनिशिंग पिआनो ब्लॅक रंगात केले आहे.
● सेन्सॉर-कंट्रोल्ड बूट लिड ऑपरेशन, पार्किंग एड प्लससह पार्क असिस्ट, ड्रायव्हर मेमरीसह पॉवर फ्रण्ट सीट्स तसेच वायरलेस चार्जिंग सुविधेसह ऑडी फोन बॉक्स यांमुळे प्रवास अत्यंत आरामदायी होईल याची निश्चिती होते.
● थ्री-झोन वातानुकूलनामुळे प्रवाशांना सुखद गारवा लाभतो आणि भवताली ३० रंगांतील समरेषीय प्रकाशयोजना असल्याने वातावरण आल्हाददायक राहते.

इन्फोटेनमेंट:
● २५.६५ सेमी मल्टिमीडिया टचस्क्रीन आणि थर्ड जनरेशन मोड्युलर इन्फोटेनमेंट प्लॅटफॉर्म एमआयबी3 गाडीच्या मध्यवर्ती स्थानी आहेत.
● स्क्रीनसोबत ऑडीचे नवीनतम एमएमआय टच, व्हॉइस कंट्रोल्स देण्यात आले आहे, हा स्क्रीन अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो यांना अनुकूल आहे. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रणे एका क्लिकवर ऑपरेट होणारी आहेत.
● आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे बीअँडओ प्रीमियम साउंड सिस्टम, यामध्ये १९ स्पीकर्स असून ते ७५५ वॅट्स निष्पत्तीवर ३डी ध्वनीप्रभाव निर्माण करतात.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कृषी कायदे परत घेताना मोदी सरकार याच अधिवेशनात आणणार हे विधेयक

Next Post

राडाः आमदाराचा अवघ्या एका मताने पराभव; कार्यकर्त्यांनीच फोडले राष्ट्रवादीचे कार्यालय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, शुक्रवार, १९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 18, 2025
IMG 20250918 WA0380 1
संमिश्र वार्ता

हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करा किंवा त्यात आवश्यक त्यात सुधारणा करा…मंत्री छगन भुजबळ

सप्टेंबर 18, 2025
G1IZjsTaQAA9THD 1024x652 1
महत्त्वाच्या बातम्या

सूक्ष्म, लघु उद्योगांसाठी जमीन अकृषक परवाना अट काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश….

सप्टेंबर 18, 2025
crime1 1
क्राईम डायरी

रूम पार्टनर झोपी गेला…परप्रांतीय तरूणाने बॅगेतील रोकड काढून केला पोबारा

सप्टेंबर 18, 2025
G0yR538bcAA85YQ e1758203148768
राष्ट्रीय

आता या परिक्षेत उमेदवारांच्या चेहेरा प्रमाणीकरणासाठी AI चा वापर…

सप्टेंबर 18, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
राज्य

पुण्यात बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले…कामगार आयुक्तांनी केले हे आवाहन

सप्टेंबर 18, 2025
crime1
क्राईम डायरी

घरातील साफ सफाई करणा-या दांम्पत्याने बंगला मालकाच्या साडेसहा लाखाच्या दागिण्यांवर मारला डल्ला

सप्टेंबर 18, 2025
court 1
महत्त्वाच्या बातम्या

हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली…मराठा समाजाला दिलासा

सप्टेंबर 18, 2025
Next Post
FE3ou2eUYAI9sEP

राडाः आमदाराचा अवघ्या एका मताने पराभव; कार्यकर्त्यांनीच फोडले राष्ट्रवादीचे कार्यालय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011