मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच केली. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये दैनंदिन कारची शक्तिशाली उपस्थिती व वैविध्यतेसह स्पोर्टी आकर्षकता व कूपेची गतीशील हाताळणी आहे. ही वैशिष्ट्ये या कारला भारतातील ऑडी ब्रॅण्डची पहिली कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर बनवतात. प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि २.० लीटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनच्या शक्तीसह सुसज्ज नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक १९० एचपी शक्ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक तिच्या विभागातील सर्वात गतीशील कार आहे आणि फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते.
नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही कार ओकापी ब्राऊन आणि पर्ल बिज हे दोन इंटीरिअर रंग पर्याय देखील देते. नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक ५१,४३,००० रूपये एक्स-शोरूम या किंमतीत उपलब्ध आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक या कारमध्ये आकर्षक डिझाइन व स्पोर्टी कार्यक्षमता आहे. ही कार संभाव्य ऑडी क्यू३ ग्राहकांना निवड करण्याचा पर्याय देते. ऑडी क्यू३ विभागामध्ये अग्रणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक ग्राहकांमधील तिच्या लोकप्रियतेची पुनरावृत्ती करेल. आम्ही गेल्या वर्षी लाँच केलेल्या ऑडी क्यू३ ला मिळालेल्या उत्स्फूर्त यशामधून आम्हाला नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक लाँच करण्यास प्रेरणा मिळाली आहे. आम्हाला देशामध्ये ही कार अत्यंत यशस्वी ठरण्याचा विश्वास आहे.’’
नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक एस-लाइन एक्स्टीरिअर पॅकेजसह स्पोर्टीयर व शार्पर आहे, तसेच तिची कूपे-सारखी डिझाइन व स्टायलिश नवीन अलॉई व्हील्स असलेली विभागातील पहिलीच कार आहे. की शिवाय प्रवेशासाठी कम्फर्ट की आणि सानुकूल एैसपैस जागा अशी वैशिष्ट्ये आकर्षक लुकसह युटिलिटी व आरामदायीपणाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांसाठी या कारला पसंतीची बनवतात.
नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकमध्ये क्वॉट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे, जी रस्त्यांच्या सर्व स्थितींमध्ये ट्रॅक्शन, गतीशीलता, स्थिरता व डायनॅमिक हाताळणीसंदर्भात उत्तम सुविधा देते. तसेच नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅकची ड्रायव्हिंग क्षमता वाढवण्यासाठी व समायोजित करण्यासाठी ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट ड्रायव्हरला विविध ड्रायव्हिंग मोड्समधून निवड करण्याची सुविधा देते.
Step up and follow your impulse. The new Audi Q3 Sportback is raring to go. With sporty, practical, and elegant design this power-packed quattro all-wheel drive is ready to roll.#AudiIndia #FutureIsAnAttitude #AudiQ3Sportback pic.twitter.com/hS8HXYkUOL
— Audi India (@AudiIN) February 13, 2023
ड्राइव्हेबिलिटी:
पंची २.० लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनसह क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह
१४० केडब्ल्यू (१९० एचपी) शक्ती आणि ३२० एनएम टॉर्कची निर्मिती. फक्त ७.३सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते
क्वॉट्रो – ऑल व्हील ड्राइव्ह
७ स्पीड एस ट्रॉनिक ट्रान्समिशन
ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
प्रोग्रेसिव्ह स्टीअरिंग
कम्पर्ट सस्पेंशन
हिल स्टार्ट असिस्ट
क्रूझ कंट्रोल सिस्टमसह स्पीड लिमिटर
लेदरने रॅप केलेले ३ स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टीअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स
एक्स्टीरिअर:
एस-लाइन एक्स्टीरिअर पॅकेज
४५.७२ सेमी (आर१८) ५-स्पोक व्ही-स्टाइल (‘एस’ डिझाइन) अलॉई व्हील्स
पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
एलईडी हेडलॅम्प्स
एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्ससह डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स
हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
Power takes a new shape! Introducing the new Audi Q3 Sportback with quattro all-wheel drive.
Make every experience exhilarating! Bookings open now.#AudiIndia #FutureIsAnAttitude #AudiQ3Sportback pic.twitter.com/fkgKHN9p8V— Audi India (@AudiIN) February 6, 2023
इंटीरिअर:
अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लससह ३० रंग पर्याय
पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह ४ वे लंबर सपोर्ट
लेदर/लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
रिअर सीट प्लससह फोअर /आफ्ट अॅडजस्टमेंट
मायक्रो-मेटालिक सिल्व्हरमध्ये डेकोरेटिव्ह इनसर्टस्
फ्रण्ट डोअर स्कफ प्लेट्स, अॅल्युमिनिअम इनसर्टस, ‘एस’ लोगोसह प्रकाशित
वैशिष्ट्ये:
२५.६५ सेमी (१०.१ इंच) एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच
ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस
ऑडी साऊंड सिस्टम (१० स्पीकर्स, ६ चॅनेल अॅम्प्लिफायर, १८० वॅट)
ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टम
ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
२-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम
पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा
कम्फर्ट की सह गेस्चर कंट्रोल्ड टेलगेट
इलेक्ट्रिकली चालू-बंद होणारे लगेज कम्पार्टमेंट लिड
एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर-अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्ही बाजूंनी ऑटो-डिमिंग
फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर-व्ह्यू मिरर
स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज
६ एअरबॅग्ज
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम
आयएसओएफआयएक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि आऊटर रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
अॅण्टी-थेफ्ट व्हील बोल्ट्स आणि स्पेस वाचवणारे स्पेअर व्हील
विक्री-पश्चात्त पॅकेजेस:
मर्यादित कालावधीसाठी कॉम्प्लीमेण्टरी २+३ वर्षांची विस्तारित वॉरंटी
५ वर्षे आरएसएचा समावेश
ग्राहकांना जवळपास ७ वर्षांपर्यंत आणखी वॉरंटी एक्स्टेंशन आणि जवळपास १० वर्षांपर्यंतचे रोड साइड असिस्टण्स कव्हरेज खरेदी करण्याचा पर्याय आहे
ग्राहकांना ७ वर्षांच्या कव्हरेजपर्यंत पीरियोडिक मेन्टेनन्स व सर्वसमावेशक मेन्टेनन्स पॅकेजेस खरेदी करण्याचा पर्याय आहे
Audi India Launch Q3 Sportback Car Features and Price