सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘ऑडी Q3’ लॉन्च: अवघ्या ७.३ सेकंदात घेणार १००चा स्पीड; अशी आहेत या आलिशान कारची वैशिष्ट्ये

by Gautam Sancheti
ऑगस्ट 30, 2022 | 5:06 pm
in राज्य
0
Static photo 
Colour: Pulse orange

Static photo Colour: Pulse orange


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये लॉन्च केली. नवीन ऑडी क्यू३ सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त परिपूर्ण कौटुंबिक कार आहे. आता सेकंड जनरेशनमधील ऑडी क्यू३ व्हिज्युअली अधिक डायनॅमिक असण्यासोबत एैसपैस जागा, वैविध्यता व तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपल्या वारसाला अधिक पुढे नेले आहे. नवीन ऑडी क्यू३ मध्ये प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आहे आणि २.० लिटर टीएफएसआय इंजिन आहे, जे १९० एचपी शक्ती व ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ही कार फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. नवीन ऑडी क्यू३ साठी डिलिव्हरींना या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूवात होईल.

नवीन ऑडी क्यू३ पल्स ऑरेंज, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवारा ब्ल्यू या पाच आकर्षक बाह्य रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या उपलब्ध इंटीरिअर रंग पर्यायामध्ये ओकापी ब्राऊन व पर्ल बिज यांचा समावेश आहे. ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. प्रिमिअम प्लस व्हेरिएण्टची किंमत ४४,८९,००० रूपये आणि टेक्नोलॉजी व्हेरिएण्टची किंमत ५०,३९,००० रूपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आज आम्ही नवीन ऑडी क्यू३ च्या लॉन्चसह आमची उत्पादन श्रेणी वाढवत आहोत. ऑडी क्यू३ भारतातील सर्वाधिक विक्री होणारी व विभागातील अग्रणी कार राहिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन ऑडी क्यू३ तिच्या यशाची पुनरावृत्ती करेल. नवीन ऑडी क्यू३ सह आम्ही या वेईकलचा नवीन लुक व दर्जात्मक वैशिष्ट्यांसह सर्वोत्तम तत्त्व सादर करत आहोत.”

नवीन ऑडी क्यू३ तिच्या पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक स्‍पोर्टियर दिसते आणि सर्व आकारमानांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अष्टकोनी डिझाइनमधील लक्षवेधक सिंगल फ्रेम उभ्या बार्समध्ये विभागण्यात आली आहे, तर मोठ्या एअर इनलेट्समधून पुढील बाजूची प्रबळ क्षमता आणि प्रकाश व सावलीची व्यापक आंतरक्रिया दिसून येते. अरूंद हेडलाइट्स त्यांच्या वेज आकारासह आतील बाजूने असल्यासारखे दिसतात.

नवीन ऑडी क्यू३ मध्ये क्वॉट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टिम आहे, जी सर्व प्रकारच्या रस्त्यांवर घर्षण, गतीशीलता, स्थिरता व डायनॅमिक हाताळणीसंदर्भात सर्वोत्तम सुविधा देते. तसेच नवीन ऑडी क्यू३ ची ड्रायव्हिंग क्षमता वाढवण्यासाठी व समायोजित करण्यासाठी ऑडी ड्राइव्ह सिलेक्‍ट ड्रायव्हरला ड्रायव्हिंग मोड्समधून निवड करण्याची सुविधा देते. विनासायास मालकीहक्क अनुभवासाठी नवीन ऑडी क्यू३ अनेक मालकीहक्क लाभांसह उपलब्ध आहे, जसे पहिल्या ५०० ग्राहकांसाठी ५ वर्षांची एक्स्टेण्डेड वॉरंटी आणि ३ वर्ष / ५०,००० किमी कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्विस व्हॅल्यू पॅकेज. विद्यमान ऑडी इंडिया ग्राहकांना देखील लॉयल्टी लाभ मिळतील.

https://twitter.com/AudiIN/status/1564491739741978624?s=20&t=IyHXwQpWVdu2a5cOM6I8Xw

नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लसची वैशिष्ट्ये:
› ४५.७२ सेमी (आर१८) ५-आर्म स्टाइल अलॉई व्हील्स
› क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह
› एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स
› पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
› उच्च ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
› पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लम्बर सपोर्ट
› लेदर/लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
› रिअर सीट प्लससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्टमेंट
› लेदरमध्ये रॅप केलेले ३-स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टिअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स

› सिल्व्हर अॅल्युमिनिअम डायमेन्शनमध्ये डेकोरेटिव्ह इन्सर्ट्स
› अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज (सिंगल कलर)
› पुढील बाजूस स्कफ प्लेट्ससह अॅल्युमिनिअम इन्सर्ट्स
› स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज
› कम्फर्ट सस्पेंशन
› हिल स्टार्ट असिस्ट
› फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर
› २-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम
› पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा

› क्रूझ कंट्रोल सिस्टिमसह स्पीड लिमिटर
› एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्‍ही बाजूस ऑटो-डिमिंग
› डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर
› ब्ल्यूटूथ इंटरफेस
› ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
› इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग
› सहा एअरबॅग्ज
› टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम
› इसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि बाहेरील रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
› ऑडी-थेफ्ट व्हील बोल्ट्स
› स्पेस-सेव्हिंग स्पेअर व्हील

नवीन ऑडी क्यू३ टेक्नोलॉजीची वैशिष्ट्ये:
› अॅल्युमिनिअल लुकमधील इंटीरिअर (मिरर अॅडजस्टमेंट स्विचवरील एलीमेण्ट्स, पॉवर विंडो स्विचेस, पार्किंग ब्रेक कंट्रोल बटन आणि अॅल्युमिनिअम लुकमधील डोअर स्ट्रिप्स)
› एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच
› ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
› ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस
› अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस (३० रंग)
› कम्फर्ट कीसह गेस्चर-नियंत्रित टेलगेट
› लगेज कम्पार्टमेंट लिड, जे इलेक्ट्रिकली उघडते व बंद होते
› ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टिम
› ऑडी साऊंड सिस्टिम (१० स्पीकर्स, १८० वॅट)

https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19

Audi India Launch Audi Q3 Features Price and Details

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘…म्हणून मला क्लिन चीट मिळाली’, मनीष सिसोदियांनी केला हा दावा

Next Post

नाशिक – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250922 WA0409
महत्त्वाच्या बातम्या

आता आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास मिळणार इतक्या कोटींचा पुरस्कार

सप्टेंबर 22, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0388 1
महत्त्वाच्या बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन….

सप्टेंबर 22, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या तारखेदरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता…

सप्टेंबर 22, 2025
crime1
क्राईम डायरी

इमारतीतून चोरट्यांनी लिफ्टच्या बॅट-या चोरल्या…ओमकारनगर येथील घटना

सप्टेंबर 22, 2025
cm untold story4 1024x682 1
संमिश्र वार्ता

‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन…

सप्टेंबर 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास या तारखे पर्यंत मुदतवाढ

सप्टेंबर 22, 2025
modi 111
महत्त्वाच्या बातम्या

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

सप्टेंबर 22, 2025
Next Post
carona 11

नाशिक - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ही आहे स्थिती

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011