मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात नवीन ऑडी क्यू८ च्या लाँचची घोषणा केली. नवीन ऑडी क्यू८ मध्ये डायनॅमिक स्पोर्टीनेस आणि सुधारित आकर्षकतेचे परिपूर्ण संयोजन आहे, जेथे प्रत्येक वैशिष्ट्यामधून आकर्षकता व शक्ती दिसून येते. लहान ओव्हरहँग्ज आणि लांब व्हीलबेस डायॅमिक व आकर्षक असले स्टान्सला अधिक सुशोभित करतात. डिझाइन सुस्पष्ट व्हॉल्यूम्स आणि आकर्षक वैशिष्ट्यांचे इंटरप्ले आहे, जी या फुली लोडेड नवीन ऑडी क्यू८ मध्ये अधिक सुधारण्यात आली आहे. नवीन ऑडी क्यू८ भारतात १,१७,४९,००० रूपये एक्स–शोरूम या सुरूवातीच्या किंमतीत उपलब्ध आहे.
नवीन ऑडी क्यू८ च्या लाँच व्यतिरिक्त, ऑडी इंडिया भारतात फक्त पंधरा वर्षांमध्ये १००,००० कार्सची विक्रीच्या करण्याच्या संस्मरणीय क्षणाला देखील साजरे करत आहे. या टप्प्याला साजरे करण्यासाठी ब्रँडने ऑडी ग्राहकांसाठी १००-डे सेलिब्रेशन बेनीफिट सादर केले आहे, ज्यामध्ये कोणत्याही खरेदीवर लॉयल्टी फायदे, सर्विस प्लॅन्स, एक्स्टेण्डेड वॉरंटी, ऑडी जेन्यूएन अॅक्सेसरीज, ऑडी जेन्यूएन मर्चंडाइज व कलेक्शन्स आणि आकर्षक कॉर्पोरेट व ट्रेड-इन फायद्यांचा समावेश आहे.
ऑडी क्यू८ची वैशिष्ट्ये:
ड्राइव्ह आणि कार्यक्षमता:
•३.० लीटर टीएफएसआय इंजिनची शक्ती, जे देते ३४० एचपी शक्ती आणि ५०० एनएम टॉर्क, तसेच उच्च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेसाठी ४८ व्होल्ट माइल्ड हायब्रिड तंत्रज्ञानासह सुधारण्यात आले आहे.
- फक्त ५.६ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते, अव्वल गती २५० किमी/तास.
•जलद व स्मूद-शिफ्टिंग एट-स्पीड टिपट्रॉनिक ट्रान्समिशन विनासायास व प्रतिसादात्मक ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री देते. - क्वॉट्रो परमनण्ट ऑल-व्हील ड्राइव्ह सर्व ड्रायव्हिंग स्थितींमध्ये अपवादात्मक घर्षण व स्थिरता देते.
- डॅम्पर कंट्रोलसह सस्पेंशन संतुलित व आरामदायी राइड देते.
- इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टीअरिंग अचूक हाताळणी व सुधारित ड्रायव्हिंग गतीशीलता देते.
- सहा कस्टमायझेबल ड्रायव्हिंग मोड्ससह ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, तसेच ‘इंडिव्हिज्युअल’ मोड क्यू८ च्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करते.