मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात त्यांची प्रमुख सेदान नवीन ‘ऑडी ए८ एल’च्या बुकिंग्जची सुरूवात केली. ३.० लिटर टीएफएसआय इंजिन, ४८ व्होल्ट माइल्ड-हायब्रिड सिस्टिम आणि क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्हचे संयोजन असलेली नवीन ऑडी एल८ एल उत्साहवर्धक ड्रायव्हिंग गतीशीलता देते. १०,००,००० रूपयांच्या सुरूवातीच्या बुकिंग रक्कमेसह ऑडी एल८ एल बुक करता येऊ शकते.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आज आम्ही आमची प्रमुख सेदान नवीन ऑडी एल८ एलसाठी बुकिंग्जना सुरूवात करत आहोत. ऑडी एल८ एलचे भारतात निष्ठावान चाहते आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की, ही आकर्षक सेदान तिची प्रबळ कामगिरी कायम ठेवेल. नवीन ऑडी एल८ एलसह आम्ही उत्तम मागणी मिळत असताना आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमधील प्रमुख कार्सवरील फोकस कायम ठेवत आहोत.”
ऑडी एल८ एलमध्ये उच्चस्तरीय लक्झरी, आरामदायीपणा व वैशिष्ट्ये आहेत. नवीन ऑडी एल८ एल विविध सानुकूल पॅकेजेससह सादर करण्यात येईल, ज्यामध्ये रिअर रिलॅक्सेशन पॅकेजसह रिक्लायनर, फूट मसाजर, डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह अॅनिमेटेड प्रोजेक्शन्स आणि इतर अनेक सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत.
ही सेदान उच्च दर्जाच्या राइड क्वॉलिटीसाठी उल्लेखनीय ड्रायव्हिंग गतीशीलतेसह दिग्गज क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आणि प्रेडिक्टिव्ह एअर सस्पेंशन येते. ग्राहक त्यांची वैयक्तिकृत ऑडी एल८ एल बुक आणि कन्फिगर करण्यासाठी त्यांच्या जवळच्या ऑडी इंडिया डिलरशीपशी संपर्क साधू शकतात किंवा www.audi.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.