नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): करमणूक कर शुल्काच्या दंडात्मक रकमेपोटी जप्त केलेल्या मौजे नाशिक शहर येथील हॉटेल साईसिद्धी प्रा.लि. यांच्या मालकीच्या स.नं. 910/2/1/1 क्षेत्र 91.54.50 आर चौ.मी., स.नं. 910/2/1/2/1/1 क्षेत्र 80.00.00 आर चौ.मी. व स.नं. 910/2/1/2/1/2 क्षेत्र 11.72.00 आर चौ.मी. अशा एकूण तीन वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावद्वारे विक्री केली जाणार आहे. हा लिलाव 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. शोभा पुजारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जप्त करण्यात आलेल्या हॉटेल साईसिद्धी प्रा.लि. यांच्या तीनही मालमत्तेची सरकारी किंमत रूपये 43 कोटी 25 लाख 5 हजार 400 इतकी आहे.
सदर लिलावात सहभागी होणारे हे शेतकरी असणे अनिवार्य आहे. तसेच लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली मिळकतीची हातची किंमत (Upset price) इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जप्त स्थावर मालमत्तेची लिलावद्वारे विक्री
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): अवैध वाळू साठा दंडात्मक रकमेपोटी जप्त केलेली चेअरमन कर्मयोगी को.ऑप. हौसिंग सोसायटी मधील अनंतराव शंकरराव जाधव यांच्या मालकीची मौजे नाशिक शहर 5 येथील स.नं. 777/2/2/3 प्लॉट नं.3 क्षेत्र 3.16.87 आर चौ.मी ही मिळकत व अमित अरविंद अलई यांच्या मालकीची स.नं. 777/2/2/4 प्लॉट नं.4 क्षेत्र 3.75.37 आर चौ.मी या दोन्ही स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. हा लिलाव 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसीलदार कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ.शोभा पुजारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जप्त करण्यात आलेली मधील अनंतराव शंकरराव जाधव यांच्या मालमत्तेची सरकारी किंमत रूपये 60 लाख 20 हजार 530 इतकी असून अमित अरविंद अलई यांच्या मिळकतीची सरकारी किंमत रूपये 71 लाख 32 हजार 30 इतकी आहे.
सदर लिलावात सहभागी होणारे हे शेतकरी असणे अनिवार्य आहे. शेतकरी नसल्यास मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 मधील तरतुदीद्वारे शेतकरी बाबतची कार्यवाही करून घेणे अनिवार्य असेल. तसेच लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली मिळकतीची हातची किंमत (Upset price) इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जप्त मालमत्तेचा 6 जानेवारीला लिलाव
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा): अवैध वाळू साठा दंडात्मक रकमेपोटी जप्त केलेली भिमा महादू नगारे यांच्या मालकीच्या मौजे चाडेगाव, ता.जि.नाशिक येथील गट नं. 101 क्षेत्र 0.84.00 आर चौ.मी. या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे. हा लिलाव 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसीलदार कार्यालय, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ.शोभा पुजारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जप्त करण्यात आलेली भिमा महादू नागरे यांच्या मालमत्तेची सरकारी किंमत रूपये 96 लाख 60 हजार इतकी आहे. सदर लिलावात सहभागी होणारे हे शेतकरी असणे अनिवार्य आहे. शेतकरी नसल्यास मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948 मधील तरतुदीद्वारे शेतकरी बाबतची कार्यवाही करून घेणे अनिवार्य असेल. तसेच लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली मिळकतीची हातची किंमत (Upset price) इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.