मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जेष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. गेल्या वर्षीच त्यांनी कॅन्सरवर यशस्वी मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा शूटिंगला सुरुवातही केली होती. त्यानतंर आता गेले दोन तीन दिवस ते हॅास्पिटमध्ये एॅटमिट होते. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी, मराठी मालिका विविध भूमिका साकारल्या आहेत. अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी अनेक चित्रपट व नाटकांमध्ये सुध्दा काम केले.
ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झाल्याचे वृत्त कळले. त्यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली असून परमेश्वर या दु:खातून सावरण्याचे बळ परचुरे कुटुंबियांना देवो व त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना! असे श्रध्दांजली व्यक्त करतांना म्हटले आहे.