मुंबई – ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना १५ ऑगस्ट २०२१ पासून उपनगरीय रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांमधून फोटो पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासेसवर क्यू आर कोड असतील असेही ते म्हणाले. पण, स्टॅंडअप कॉमेडीयन अतुल खत्रींनी लसीचं प्रमाणपत्र टी शर्टवर छापून भन्नाट आयडिया काढली. त्यामुळे त्यांचा हा टी शर्टचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा ठरला आहे. अतुल खत्रींनी घातलेल्या टी-शर्टवर लस घेतलले दोन्ही कोरोना प्रमाणपत्र प्रिंट केले आहे.
https://twitter.com/one_by_two/status/1424397067951116293?s=20