विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिक ते बेळगाव विमानसेवा देणाऱ्या स्टार एअर या कंपनीने जबरदस्त ऑफर आणली आहे. नाशिक-बेळगाव विमानसेवेचे बुकींग अवघ्या १९९९ रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहे. कंपनीच्या वेबसाईटवर याचे बुकींग सध्या उपलब्ध आहे. सोमवार, शुक्रवार आणि रविवार असे तीन दिवस नाशिक-बेळगाव सेवा दिली जात आहे. २ जुलैपासून ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. त्यासाठीच ही ऑफर देण्यात आली आहे.