इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला करत अवघ्या ३६ तासांत बदला घेतला. या हल्ल्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. इराणने सिरियाच्या पश्चिम हसाका प्रांतातील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यानंतर लष्करी तळाच्या मुख्य प्रवेशव्दारावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
इराणने हा हल्ला मोर्टारने केला असल्याची माहिती समोर आली आहे. इराणने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. मात्र इराणने इशारा दिला होता. त्यामुळे हा हल्ला इराणनेच केला असल्याचे बोलले जात आहे.
अमेरिकेचे आखाती देशांमध्ये १९ ठिकाणी तळ आहेत. अमेरिकेने सिरीया, कतारसाऱख्या देशांमध्ये मोठे तळ बांधलेले आहेत. मध्ये पूर्वेत ५० हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत. आता इराणवर हल्ला केल्याने या तळांना धोका वाढला आहे.