हैदराबाद – आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यात पमेडी गावात भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम केंद्राला अचानक मोठी आग लागली. या आगीत हे केंद्र पूर्णतः खाक झाले आहे.
पमेडी एसबीआयच्या एटीएमला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे पथक सव्वातीन वाजता पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीला शांत करण्यासाठी पंधरा मिनिटे लागल्याचे, अनंतपुरम अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी अथर्वा यांनी सांगितले. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत नोटांसह ४४ लाख ५९ हजारांचे नुकासन झाल्याचा अंदाज आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळाले असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.