नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विनयनगर भागातील एटीएम चोरट्यांनी फोडले. या घटनेत रोकडसह युपीएस व इंटरनेट मॉडेम असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोजखान मन्सुरखान पटेल (रा.वडाळारोड) यांनी फिर्याद दिली आहे. विनयनगर येथील प्लॉट नं. ९१ मधील गाळ््यात असलेले एका बँकेचे एटीएम बुथ चोरट्यांनी फोडले. ही घटना गुरूवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्यांनी बुथ असलेल्या गाळ््यामध्ये प्रवेश करून एटीएम मशिनच्या बॅकरूमचा दरवाजा तोडून सुमारे २४ हजार ६०० रूपयांची रोकड तसेच एटीएम मशिन,युपीएस आणि इंटरने मॉडेम असा ७४ हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहेत.
चोरट्यांनी ३५ हजाराची रोकड चोरून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ३५ हजाराची रोकड चोरून नेली. ही घरफोडी अमृतधाम भागात झाली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब अशोक जगताप (३२ रा.त्रिकोणी बंगल्याजवळ,अमृतधाम) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जगताप कुटुंबिय बुधवारी (दि.२६) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार भोये करीत आहेत.
……..