इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरमधील खापरखेडा येथील अॅक्सेस बँकेच्या एटीएममध्ये तांत्रिक बिघाडामुळे ६०० रुपये अतिरिक मिळत असल्यामुळे रांगा लागल्याचे चित्र होते. या एटीएममध्ये हजार रुपये काढल्यास १६०० आणि ५०० रुपये काढल्यास ११०० रुपये बाहेर पडत होते. ही घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारस घडली.
हा प्रकारानंतर खापरखेडा येथील अरुण महाजन यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. तसचे बँकेलाही कळवले. त्यानंतर एटीएम दुपारी बंद करण्यात आले. त्यानंतर झालेली तांत्रिक चूक दुरुस्त करण्यात आली. पण, ही चूक दुरुस्त करेपर्यंत या एटीएममधून सुमारे ३ लाखांपेक्षा अधिक रुपये अतिरिक्त गेले.
या घटनेनंतर दुरुस्तीनंतर पुन्हा सायंकाळी ७ वाजता सुरु करण्यात आले. आता जास्तीचे गेलेले पैसे खातेदाराकडून पुन्हा वसूल करण्याचे बँकेपुढे मोठे आव्हान आहे. त्यात आता ते कसे वसूल करतात हे बघावे लागणार आहे.