विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
केंद्र शासनाच्या वतीने भारतीय नागरिकांना सेवानिवृत्ती काळात लाभ मिळावा, यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यापैकीच अटल पेन्शन योजना ( एपीवाय) ही एक केंद्र सरकार संचालित पेन्शन योजना आहे. सदर योजना ही पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण द्वारे चालवले जाते. निवृत्ती दरम्यान आपल्याला अनेक दैनंदिन खर्च असतात विशेषत: आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याने या खर्चात वाढ होते. यामुळे निवृत्तीदरम्यान फिक्स्ड पेन्शनसाठी गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी एपीवाय हा एक चांगला पर्याय आहे. असंघटित क्षेत्रातील लोकांना वृद्धापकाळात उत्पन्नाची सुरक्षा देण्यासाठी सरकारने पेन्शन योजना सुरू केली आहे.
असंघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही भारतीय नागरिक सरकारी बँकेत खाते उघडून या योजनेत भाग घेऊ शकतो. तसेच त्याकरिता १८ते ४० वयोगटातील अटल पेन्शन योजना योजनेत गुंतवणूक करू शकतो. केंद्र सरकार राष्ट्रीय पेन्शन योजनेद्वारे (एनपीएस) अटल पेन्शन योजनेचे व्यवस्थापन करते. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीच्या वेळी वयाच्या ६० व्या वर्षी लाभ मिळू लागतो. म्हणजेच याचा अर्थ असा की, संबंधित गुंतवणूकदारांना किमान ४० वर्षांच्या कालावधीसाठी या योजनेत गुंतवणूक करावी लागते.अटल पेन्शन योजनेमध्ये सदर गुंतवणूकदारांना त्यांच्या मृत्यूपर्यंत मासिक पेन्शन मिळते. तसेच गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, जोडीदाराला त्याच्या मृत्यूपर्यंत पेन्शन मिळत राहते. इतकेच नव्हे तर गुंतवणूकदार आणि जोडीदाराचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित केली जाते.
खातेदाराने एनपीएस खाते उघडण्यास विलंब केल्यास हे मासिक पेन्शन मुदत वाढतच राहते. याचा अर्थ, वयाच्या १८ व्या वर्षी सदर खाते उघडणे चांगले आहे, कारण कमाल योगदान ४२ वर्षे असून यात मासिक योगदान मिळते. सदर खातेधारकाचे वय १८वर्षांपेक्षा जास्त असल्यास मासिक अधिक योगदान द्यावे लागेल. योजनेच्या चार्टनुसार, ३० वर्षांच्या व्यक्तीसाठी, १ हजार रुपये पेन्शनसाठी त्याचे मासिक योगदान ११६ रुपये आहे. तसेच खातेधारकाने ५ हजार रुपयांचे मासिक पेन्शन निवडले तर सदर मासिक योगदान ५७७ रुपयांवर असेल.