चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चांदवड येथे धावत्या ट्रॅव्हलर टेम्पोने घेतला पेट घेतल्याची घटना घडली. चांदवड येथून मालेगावच्या दिशेने जात असताना राहुड गावाजवळ शॉर्टसर्किटमुळे या ट्रॅव्हलर टेम्पोला आग लागली. टेम्पोमध्ये १६ प्रवासी व एक चालक होता. टेम्पोमध्ये आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने सर्व प्रवासी खाली उतरवून सर्वांना सुरक्षित ठिकाणी पाठवले. चांदवडच्या सोमाटोल प्लाझाने तातडीने घटनास्थळी दाखल होत पेट घेतलेला टेम्पोची आग विझवली.