मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे एकाच प्रकरणाची चर्चा आहे, ते म्हणजे १६ आमदारांचे निलंबन होणार की नाही? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे. नार्वेकर परदेश दौऱ्यावर असल्याने आमदारांचे निलंबन होईल की नाही, आमदार त्या स्थितीत राहून शिंदे सरकार वाचेल की नाही? यासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते. परंतु आता राहुल नार्वेकर परदेश दौऱ्याहून परत आल्याने त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ॉ
सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेताना कोणतीही घाई मी करणार नाही; पण विलंबही करणार नाही. माझा निर्णय संविधानातील तरतुदी व कोर्टाच्या निर्देशानुसार असेल, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधिक प्रतिक्रिया व्यक्त करताना नार्वेकर म्हणाले की, ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. आपली बाजू मांडण्यासाठी काहींनी वेळ मागून घेतला आहे, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ म्हणजे -‘रिझनेबल टाइम’ अशी व्याख्या अध्यक्ष नार्वेकर यांनी केली.
https://twitter.com/mumbaitak/status/1658426622955888646?s=20
कोर्टाने दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना भेटून केली. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अध्यक्षांना घेराव करू, त्यांना फिरू देणार नाही, अशी भाषा विरोधक करीत आहेत. ते कोणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे आमच्या सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/zee24taasnews/status/1658435878337781760?s=20
Assembly Speaker Rahul Narvekar 16MLA Case