मुंबई – राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होताच एका निर्णयाने खळबळ उडाली आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांची राज्य सरकारने तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. माहिती व जनसंपर्क विभागाचा अतिरीक्त कारभार सनदी अधिकारी दीपक कपूर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, पांढरपट्टे यांची बदली मृदा, जलसंधारण व रोजगार हमी योजना या विभागाच्या सचिव पदावर करण्यात आली आहे. पांढरपट्टे यांची बदली का करण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही.