इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या भागातील प्रश्न, समस्या सरकारपर्यंत जाऊन ते सुटावेत. नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये यासाठी मतदार लोकप्रतिनिधीला निवडून देत असतात. मतदारांची ही साधी अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. अनेकदा हे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकतात, किंवा त्यांना स्वतःची तुंबडी भारण्यातच रस असल्याचे दिसते.
त्रिपुरातील एका आमदाराने तर कमालच केली. अधिवेशन सुरू असताना नागरिकांचे प्रश्न मांडण्याऐवजी त्रिपुराचे भाजपा आमदार जादब लाल नाथ हे चक्क पॉर्न व्हिडीओ पहात होते. पॉर्न बघतानाचा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी भाजपा नेत्याच्या या व्हायरल व्हिडीओचा खरपूस समाचार घेतला आहे. अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देणाऱ्या प्रकाश राज यांनी भाजपा आमदाराचे हे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले आहे.
माहितीनुसार, जादब लाल नाथ यांचा हा व्हिडीओ ३० मार्चचा असल्याचे सांगण्यात आले. या व्हिडीओमध्ये ते सभागृहात बसलेले दिसत असून त्यांच्या हातात फोन आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच राजकीय खळबळ उडाली आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही येत असून अनेक जणांनी जादब यांच्यावर टीकाही केली आहे.
जादब यांनी २०१८ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते त्रिपुराच्या बागबासा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी सीपीएमच्या बिजिता नाथ यांचा पराभव करत निवडणूक जिंकली. त्यानंतर २०२३ मध्येही त्यांनी आपली जागा कायम राखली. मात्र सध्या नाथ हे सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य झाले आहेत. अद्याप यावर त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिल्याची काहीही माहिती समोर आली नाही.
BlueJP…. SHAME..ಬ್ಲೂJP. .. ಛೀ..ಛಿ.. ಕರ್ಮ… #justasking https://t.co/qLfRfObyXs
— Prakash Raj (@prakashraaj) March 30, 2023
Assembly Session BJP MLA Watching Porn Video