सोनितपूर (आसाम) – पहाटेच्या सुमारास येथे शक्तीशाली भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली. हा भूकंप ६.४ रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता. भूकंपात हादरे बसताच सर्वत्र खळबळ उडाली. नागरिक तातडीने घराबाहेर पडून रस्त्यावर आले. या भूकंपात अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र अनेक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. भूकंपामुळे रस्त्याला मोठा तडा गेला असून एका ठिकाणी दोन बिल्डींगही झुकल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
बघा हे दोन्ही व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1387260782182768641?s=03
https://twitter.com/ANI/status/1387262486978564098