इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तब्बल ११,३०४ नर्तक आणि २५४८ ढोलकींनी एकाच ठिकाणी ‘बिहू’ नृत्य आणि ‘ढोल’ वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये प्रवेश केला. बिहू हे लोकनृत्यातील सर्वात मोठे गाणे आहे. लंडनमधील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या मुख्यालयातील जजिंग टीमच्या उपस्थितीत कलाकारांनी त्यांचा शो सादर केला आणि ‘बिहू’ नृत्य आणि ‘ढोल’साठी जागतिक यश मिळवले. तशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
https://twitter.com/PMOIndia/status/1646902998143238144?s=20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत “सर्वात मोठे बिहू नृत्य आणि सर्वात मोठे ढोल ड्रम एन्सेम्बल” या विक्रमी कामगिरीबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संघाकडून आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले. १३ एप्रिल रोजी गुवाहाटी येथील सुरसजाई स्टेडियमवर ११३०४ लोकनर्तक आणि २५४८ ढोलकींनी ही कामगिरी केली. गुवाहाटी येथील सुरसजाई स्टेडियमवर मेगा बिहू कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी लेझर शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि इतर नेते उपस्थित होते.
https://twitter.com/ANI/status/1646870643374456832?s=20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आसामची राजधानी गुवाहाटी येथे एम्सचे उद्घाटन केले. त्यांनी ईशान्येतील पहिले एम्स राष्ट्राला समर्पित केले. याशिवाय अन्य तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले. यामध्ये गुवाहाटीमधील कोक्राझार, नलवारी आणि नागाव महाविद्यालये आणि रुग्णालयांचा समावेश आहे. एम्स गुवाहाटीची पायाभरणी पंतप्रधान मोदींनी मे २०१७ मध्ये केली होती. हे ११२० कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी आसामला १४,३०० कोटी रुपयांची भेट दिली आहे.
https://twitter.com/DDNewslive/status/1646913713717538816?s=20
Assam Bihu Dance Performance Guinness World Record