विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली/दिसपूर
विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यावर आसामच्या जनतेने पुन्हा विश्वास दाखविला आहे. एकच व्यक्ती दुसर्यांदा मुख्यमंत्री होण्याची घटना आसाममध्ये प्रथमच घडत आहे. विधानसभेच्या १२६ जागांसाठी झालेल्या मतदानात भाजप ७६ जागांवर तर काँग्रेसने ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. इतर अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत.
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदाने झाले. विधानसभेच्या १२६ पैकी बहुमतासाठी ६४ जागा असणे आवश्यक आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणाला सुरुवात झाली. भाजपने आधीपासूनच आघाडी घेतल्यामुळे भाजपचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सत्ता कायम राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी प्रचारसभा घेऊन पूर्ण ताकद पणाला लावली होती. वेगवेगळ्या जनमत चाचणीनुसार, राज्यात भाजपला ७३ – ७४ जागा मिळण्याची तर काँग्रेसला ५१-५२ आणि अपक्षांना १-२ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ही शक्यता खरी झाली आहे.
दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
विद्यामान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता आहे. सोनोवाल सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. आसामच्या स्थापनेनंतर म्हणजेच १९४६ नंतर आतापर्यंत कोणीही दुसर्यांदा मुख्यमंत्री झालेले नाही. ५९ वर्षीय सर्बानंद सोनोवाल २४ मे २०१६ रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते.
—