अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ताश्कंद उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग तिसऱ्यांदा व जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सलग दुसऱ्यांदा भारतीय संघात निवड झाली. ताश्कंद उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ ज्युनिअर सिनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर हिची सलग तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
४० किलो वजनी गटातील जागतिक युथ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती व मनमाड च्या जयभवानी व्यायामशाळा व श्री गुरू गोविंद सिंग हायस्कुलची विद्यार्थिनी आकांक्षा किशोर व्यवहारे हिची सुद्धा सलग दुसऱ्यांदा उझबेकिंस्थान येथे होणाऱ्या एशियन युथ वेटलिफ्टिंग या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे उझबेकिंस्थान मधील ताशकंद शहरात १५ ते २६ जुलै २०२२ दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मनमाड सारख्या छोट्या शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रशिक्षक तृप्ती व आकांक्षा ने नाशिक जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक वाढविला आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, गुरू गोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंग प्राचार्य सदाशिव सुतार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.