इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही खेळ असो त्यामध्ये हार जित होतच असते, कोणत्या संघ जिंकेल याचा काही नियम नसतो. क्रिकेटमध्ये तर नेहमीच असे घडते. परंतु काही वेळा नेमका अंदाज लावता येतो की, हा संघ निश्चितच जिंकेल. श्रीलंकेची सुद्धा आता अशी स्थिती झालेली दिसून येते. कारण श्रीलंकेने अखेर आशिया कप 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशवर 2 विकेट राखून विजय मिळवला. श्रीलंकेच्या टीमने आता सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला. शेवटच्या षटकापर्यंत पारडं कोणाच्या बाजूने झुकणार? याचा अंदाज येत नव्हता. श्रीलंकेचा संघ धावा करत होता. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला विकेटही पडत होते. एका नोबॉल चेंडूमुळे विजयी धाव श्रीलंकेच्या खात्यात जमा झाली.
श्रीलंका-बांगलादेश मॅच आधी खेळाडू, कोच आणि माजी खेळाडूंमध्ये शाब्दीक लढाई रंगली होती. त्याचे पडसाद मैदानात उमटताना दिसून आले. दोन्ही टीमचे खेळाडू त्वेषाने मॅच जिंकण्यासाठी खेळले. दोन्ही संघांनी काही चूका केल्या आणि चांगला खेळही दाखवला.
बांगलादेश व श्रीलंका यांच्यातला ब गटातील अखेरचा साखळी सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघांना अफगाणिस्तानकडून हार मानावी लागली होती आणि त्यामुळे आशिया चषक २०२२मधील आव्हान कायम राखण्यासाठी दोघांनाही विजय महत्त्वाचा होता. बांगलादेशने १८४ धावांचे मोठे आव्हान लक्ष्य उभे केले आणि त्याला श्रीलंकेच्या फलंदाजांकडून योग्य उत्तर मिळाले.
बांगलादेशच्या गोलंदाजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. इबादत होसैनने टाकलेले १९ वे षटक कलाटणी देणारे ठरले. त्यात षटकांची मर्यादा संथ राखल्याने अखेरच्या षटकात बांगलादेशला ५ खेळाडू ३० यार्ड सर्कलच्या आत उभे करावे लागले. त्याचा श्रीलंकेने फायदा उचलला.
पथूम निसंका व कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या दोन षटकांत त्यांनी ३१ धावा चोपल्या. पण, ४५ धावांची ही भागीदारी पदार्पणवीर इबादत होसैनने तोडली. भानुका राजपक्षा ( २) धावबाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ४ बाद ७७ अशी झाली. कुसल मेंडिसला आज नशीब साथ देताना दिसले. कुसलने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर तस्कीन अहमदने झेल घेतला. मेंडिसने ३७ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या.
श्रीलंकेला ३० चेंडूंत ४७ धावांची गरज होती आणि वनिंदू हसरंगा व कर्णधार दासून शनाका खेळपट्टीवर होते. पण, वनिंदू २ धावांवर तस्कीनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचप्रमाणे १५व्या षटकात अखेर मेंडिसला बाद करण्यात बांगलादेशला यश आले.रून चमिकाला ( १६) रन आऊट केले. ३ विकेट्स घेणाऱ्या इबादतच्या त्या षटकात १७ धावा आल्याने श्रीलंकेला ६ चेंडूत ८ धावाच करायच्या होत्या. तसेच २० व्या षटकात पहिल्या चेंडूवर लेग बाय १ धाव मिळाली. त्यानंतर चौकार गेला अन तिसऱ्या चेंडूवर २ धावा पळून काढताना श्रीलंकेने १८३ धावांची बरोबरी केली. आशिया चषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम धावांचा पाठलाग करणारी कामगिरी ठरली. श्रीलंकेच्या खेळाडूंनी विजयानंतर चक्क नागिन डान्स केला. त्यामुळे आता या विजयाची आणि त्या डान्सची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
https://twitter.com/kumarmanish9/status/1565398571926843392?s=20&t=yluir6NW0Ei_o9N5ksi_cQ
Asia Cup Srilanka Team Win No ball Players Celebration
Cricket Sports