इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी चांगले वर्चस्व मिळविले. त्यामुळेच पाकला फारशी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावाद गारद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान आहे.
भारताच्यावतीने भुवनेश्वर कुमारने ४, हार्दिक पांड्याने ३, अर्शदीप सिंहने २ तर आवेश खानने १ बळी घेतला. पाकिस्तानच्यावतीने सर्वाधिक ४३ धावा मोहम्मद रिजवानने केल्या. आशिया चषकाच्या १५ व्या मोसमातील हा केवळ दुसरा सामना असला तरी तो अंतिम सामन्यापेक्षा कमी नाही. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खान संघात आहे. भुवनेश्वर कुमारच्या नेतृत्वाखाली अर्शदीप आणि आवेश खान वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत आहेत. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषक खेळू न शकलेला युजवेंद्र चहल पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. नसीम शाह पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. भारतासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी पुन्हा एकदा ओपनिंग करताना दिसणार आहे. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. विराट कोहली आपला १०० वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आला आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये सामन्यात शतक पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे, तर बाबर आझम पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे. याआधी, 2021 च्या T20 विश्वचषकादरम्यान 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ एकाच मैदानावर आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी झाला होता आणि हा विजय पाकिस्तानचा विश्वचषक (ODI आणि T20) इतिहासातील पहिला विजय होता. अशा परिस्थितीत भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे आणि हा सामना चुरशीचा असणार आहे.
Asia Cup India Vs Pakistan Match Start