इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा १९.४ षटकात दणदणीत पराभव करत विजय मिळवला. पाकिस्तानने केलेल्या १४७ धावाचा पाठलाग करतांना भारताचे ५ खेळाडू बाद झाले. या सामन्यात रोहित शर्मा (१२) केएल राहुल ( ०), विराट कोहली (३५), सूर्यकुमार यादव(१८ ) हार्दिक पांड्या (३३ ), रवींद्र जडेजा (३५) यांनी विजय मिळवला. हार्दिक पांडया व दिनेश कार्तिक हे नाबाद राहिले. अवघे तीन बॅाल शिल्लक असतांना हार्दिक पांड्याने षटकार मारत भारताला हा विजय मिळवून दिला. या सामन्यात हार्दिक पांड्या मॅन ऑफ द मॅच ठरला.
आशिया चषकात पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला होता. या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. पाकिस्तानच्या फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी चांगले वर्चस्व मिळविले. त्यामुळेच पाकला फारशी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १४७ धावाद गारद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान होते.
भारताच्यावतीने भुवनेश्वर कुमारने ४, हार्दिक पांड्याने ३, अर्शदीप सिंहने २ तर आवेश खानने १ बळी घेतला. पाकिस्तानच्यावतीने सर्वाधिक ४३ धावा मोहम्मद रिजवानने केल्या. आशिया चषकाच्या १५ व्या मोसमातील हा केवळ दुसरा सामना असला तरी तो अंतिम सामन्यापेक्षा कमी नव्हता. त्यात भारताने विजय मिळवला.
टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ खेळला. याआधी, 2021 च्या T20 विश्वचषकादरम्यान २४ ऑक्टोबर रोजी दोन्ही संघ एकाच मैदानावर आमनेसामने आले होते. त्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयी झाला होता आणि हा विजय पाकिस्तानचा विश्वचषक (ODI आणि T20) इतिहासातील पहिला विजय होता. अशा परिस्थितीत भारताला त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी होती. ती संधी भारताने घेत पराभवाचा वचपा काढला.
Asia Cup India Vs Pakistan Match