सोमवार, ऑक्टोबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आशिया चषक स्पर्धाः भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांचा रंगणार तब्बल ३ वेळा थरार

ऑगस्ट 22, 2022 | 5:41 am
in संमिश्र वार्ता
0
India Vs Pakistan

India Vs Pakistan


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट हा खेळ केवळ भारतीय नव्हे तर जगभरातील अनेक नागरिकांचा आवडता खेळ आहे सहाजिकच राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेट स्पर्धांमध्ये नेहमीच रंगतदार सामने होतात. विशेषतः भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा सामना कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता असते.

आता अशिया कप स्पर्धा रंगणार असून यातही भारत-पाकिस्तान यांचा सामना कोण जिंकणार ?याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. युएई या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना दि. 27 ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना दि. 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला मोठी डिमांड आहे. इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे आणि एक तिकिट लाखाच्या घरात ब्लॅकने विकले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज झाला असून २० ऑगस्टला यूएईसाठी संघ रवाना होईल.

सन १९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते.
सन २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याची हाईप असताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. गांगुली म्हणाले की, मी या स्पर्धेकडे फक्त आशिया चषक म्हणून पाहत आहे, मी त्याकडे इंडिया विरुद्ध पाकिस्तान असे पाहत नाही. भारतीय संघानेही तेच करावे, अशी माझी इच्छा आहे. मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासाठी पाकिस्तानविरुद्धची लढत ही अन्य लढतींप्रमाणेच होती. मी नेहमी स्पर्धा जिंकण्याचा विचार करायचो. आताचा संघ तगडा आहे आणि त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे.

आशिया चषक स्पर्धेतही त्यांच्याकडून अशीच कामगिरी होईल, अशी मला खात्री आहे. दि.२८ ऑगस्टला भारत-पाकिस्तान यांच्यात अ गटातील पहिला सामना होणार आहे. यानंतर सुपर ४ मध्ये उभय संघ एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे आणि दोन्ही संघांचा फॉर्म पाहता फायनल त्यांच्यात झाली तर सामना अधिकच रंगतदार होईल आणि त्याची जगभरात चर्चा होईल हे निश्चित.

Asia Cup 2022 India Vs Pakistan Cricket Match
BCCI Sourav Ganguly

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यात येणार हा अनोखा श्वान; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

कांद्याचे भाव कोसळले; शेतकरी संघटनेचा रास्ता रोको ( व्हिडिओ )

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
महत्त्वाच्या बातम्या

रिल बनवला…अपलोड केला… नाशकच्या तरुणाबाबत पुढं एवढं सगळं घडलं…

ऑक्टोबर 27, 2025
IMG 20251027 WA0037
महत्त्वाच्या बातम्या

राज्यात प्रथमच लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच मंजुरी आदेश सेवा… या सरकारी योजनेला नवे डिजिटल रूप… नावीन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर चर्चा…

ऑक्टोबर 27, 2025
1002726049
महत्त्वाच्या बातम्या

नाशकात रणजी सामन्याचा थरार… बीसीसीआयचे तज्ज्ञ दाखल… या संघांमध्ये रंगणार सामना…

ऑक्टोबर 27, 2025
rainfall alert e1681311076829
मुख्य बातमी

सावधान… चक्रीवादळ येणार… पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामानाचा अंदाज…

ऑक्टोबर 27, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या, २८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 27, 2025
Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
Next Post
IMG 20220822 WA0010 e1661144319304

कांद्याचे भाव कोसळले; शेतकरी संघटनेचा रास्ता रोको ( व्हिडिओ )

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011