इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचा सामना होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांच्या या सामन्याकडे संपूर्ण जगाचेच लक्ष लागून आहे. हा सामना अतिशय थरारक होणार असल्याने भारतीयांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. कारण, अनेक महिन्यांनी हे दोन्ही संघ एकमेकासमोर येत आहेत. दुबईमध्ये होणारा हा सामना केव्हा आणि कुठे पाहता येईल, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. चला वेळ न दवडता आपण जाणून घेऊया…
– भारत आणि पाकिस्तानचा हा सामना आज दुबईमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहे.
– हा सामना दुबईमधील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता खेळवला जाईल. म्हणजेच, भारतामध्ये हा सामना सायंकाळी साडेसात वाजल्यापासून प्रेक्षकांना पाहता येईल.
– आशिया चषक स्पर्धेचे सर्व सामन्यांचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरुन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना स्टार स्पोर्ट्सच्या स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी वन आणि स्टार स्पोर्ट्स वन हिंदी या चॅनल्सवर पाहता येईल. डिस्ने-हॉटस्टारच्या माध्यमातूनही या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि अगदी स्मार्ट टीव्हीवरही डिस्ने-हॉटस्टार अॅपच्या माध्यमातून हा सामना पाहता येईल.
– तसेच सामन्याचे विविध अपडेटस आपल्याला इंडिया दर्पण लाईव्हद्वारेही आपल्याला मिळू शकणार आहेत.
Asia Cup India Pakistan Cricket Match Live Telecast
Dubai T20 Timing