इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषकात आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होत आहे. तत्पूर्वी पाक संघातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. कर्णधार बाबर आझमचे वक्तव्यातून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता याचे पडसाद संघातील खेळाडूंवरही दिसून येत आहेत.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात एक सराव सामना झाला. त्यामध्ये पाकिस्तान संघ पराभूत झाला. या सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचा कणर्धार बाबर आझम यांने म्हटले आहे की, आशिया कप स्पर्धेत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. या स्पर्धेत आम्हाला अनेक चढ-उतार पाहावे लागले. मात्र आम्ही अंतिम फेरीत पोहोचलो, ही फार मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. पाकिस्तानचा सध्याचा संघ चांगली खेळी करत आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. कर्णधार आझम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे.
पाकिस्तानी विकेट कीपर रिझवानने सामना सुरु असताना डीआरएस मागितला, त्यावेळी हा निर्णय टीमच्या कर्णधाराने मागिल्यावरच द्यायचा असतो असा नियम आहे. सामन्याच्या पंचानी त्या खेळाडूची विनंती मान्य करुन डीआरएस घेतला. त्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने मी कर्णधार आहे असे वक्तव्य केले होते. बाबर आझम याने केलेले वक्तव्य तिथल्या माईकमध्ये जशास तसे रेकॉर्ड झाले, ते सध्या सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला अधिक ट्रोल केले जात आहे. श्रीलंका विरुद्ध सामन्या पाकिस्तान संघाचा पराभव झाला. हा पराभव खूप मोठ्या फरकाने झाला आहे. श्रीलंका संघाने पाच गडी राखून हा विजय मिळविला असल्याने त्याचे अंतिम सामन्यासाठी धाबे दणाणले असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ असा आहे, बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह.
Asia Cup Final Match Today Pakistan Team Controversy