इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ नंतर तिसऱ्यांदा भारत – पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत. या दोन्ही संघात आज अंतिम सामना रंगणार आहे. याआधी टीम इंडियाने दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. आता अंतिम सामन्यातही हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहे. या सामन्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
भारताने सुपर ४ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशानंतर श्रीलंकेला हरवले. गट अ मध्ये सुध्दा भारतीय संघाने विजय मिळवला. सुपर ४ मध्ये गुणतालिकेमध्ये भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. तर दोन सामने जिंकणारा पाकिस्तान गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर आहे. श्रीलंका सर्वात खालच्या स्थानावर आहे. आशिया कम १९८४ पासून सुरु झाला. ४१ वर्षात भारत आणि पाकिस्तान कधी आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर आले नाही. पण, आज हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडणार असून पाकिस्तानचा तिसरा पराभव निश्चित असून आशिया कप भारत जिंकले हे क्रिकेटप्रेमी बोलत आहे. या सामन्यात विजेत्या संघाला २.६ कोटी, उपविजेत्या संघाला १.३ कोटी, प्लेअर ऑफ सीरीज १२.५ लाख मिळणार आहे.
या सामन्याअगोदरच पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडून वसीम अक्रमने एक भविष्यवाणी केली आहे. त्याने या सामन्यात भारताला प्रबळ दावेदार घोषित केले आहे. तर पाकिस्तानी संघ पुन्हा चांगली कामगिरी करेल असेही त्याने म्हटले आहे. माझ्यासह संपूर्ण जगाने पाहिले आहे की टी -२० सामन्यात काहीही घडू शकते. एक चांगली खेळी किंवा एक चांगले षटक संपूर्ण सामना फिरवू शकतो असेही वसीम अक्रम म्हणाला.
पाकिस्तानी गोलंदाजांनी भारतीय सलामीवीर फलंदाजांना लवकर बाद केले तर पाकिस्तानी संघ भारताच्या मधल्या फळीला उदध्वस्त करु शकतो. विशेषता. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्या लवकर बाद झाल्यामुळे टीम इंडियाला अडचणीत आणता येईल. हा सामना अत्यंत चुरशीचा असेल आणि मला आशा आहे की जो संघ सर्वोत्तम खेळेल तो विजयी होईल असेही वसीम अक्रम म्हणाला.