इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय संघाने आशिया कपस्पर्धेत साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ओमानवर २१ धावांनी विजय मिळवत सलग तिसरा सामना जिंकला. शेख झायेद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यासाठी प्रथम फलंदाजी करत भारताने ओमान संघाला विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. ओमानने या धावांचा पाठलाग करताना जोरदार झुंज देऊन २० ओव्हरमध्ये ४ विकेट्स गमावून १६७ धावाच केल्या. या विजयामुळे साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकणारा श्रीलंकेनंतर दुसरा संघ ठरला. संजू सॅमसन मॅन ऑफ द मॅच ठरला.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजाची निर्णय घेतला. भारतासाठी संजू सॅमसन याने ४५ बॉलमध्ये ५६ रन्स केले. अभिषेक शर्मा याने ३८ धावा केल्या तर अक्षर पटेल याने २६, तिलक वर्मा २९ आणि हर्षित राणा याने १४ धावा केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आले नाही. भारताने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावून १८८ रन्स केल्या. ओमानसाठी शाह फैसल, जितेन रामानंदी आणि आमिर कालमी या तिघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.
तर या सामन्यात ओमानच्या टॉप ३ फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या पण, ओमानला विजयी होता आले नाही. ओमानचे प्रयत्न अपुरे पडले. ओमानसाठी कॅप्टन जतिंदर सिंह आणि आमिर कलीम या दोघांनी ५६ धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर जतिंदर आऊट झाला. कुलदीपने ही सेट जोडी फोडली. जतिंदरने ३३ बॉलमध्ये ५ फोरसह ३२ रन्स केल्या. त्यानंतर आमिर आणि हम्माद मिर्झा या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ९३ रन्स जोडले.
भारताने अशाप्रकारे सामना जिंकला असला तरी शेवटच्या बॉलपर्यंत त्यांना विजयासाठी प्रतिक्षा करावी लागली. ओमानने भारताला सहजासहजी सामना जिंकू दिले नाही.