इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफ्रिवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली होती. पण, आपला निर्णय बदलत पाकिस्तानने नंतर यूएई विरुध्द सामना खेळला त्यात पाकिस्तानचा विजय झाला.
पाकिस्तान संघाने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत साखळी फेरीतील दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने यूएईला १४७ धावांचे आव्हान दिले होते. पण, यूएईला १७.४ ओव्हरमध्ये १०५ च धावा करता आल्या. पाकिस्तान या विजयामुळे बी ग्रुपमधून सुपर ४ मध्ये प्रवेश करणारा भारतानंतरचा दुसरा संघ ठरला आहे. सुपर ४ मध्ये पाकिस्तान गेल्यानंतर आता पुन्हा भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीनंतर लढत होणार आहे.
यूएई विरुध्द सामना खेळण्याअगोदर ब-याच नाट्यमय हालचाली घडल्या. भारत – पाकिस्तान सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. ही जबाबदारी अंपायरची होती. असे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संबधित अंपायरवर कारवाई करा अशी मागणी केली होती. या संबधी पाकिस्तानने आयसीसीली दोन पत्रही लिहले. पण, कारवाई झाली नाही. त्यामुळे पाकिस्तानने आयसीसीच्या भूमिकेविरोधात आशिया चषकातून माघार घेण्याचा निर्णय़ घेतला होता. पण, तो नंतर मागे घेण्यात आला. दरम्यान पीसीबीने एका निवेदनाव्दारे सामनाधिकारी अँडी पायक्रॅाप्ट यांनी पाकिस्तान संघ व्यवस्थापक व कर्णधाराची माफी मागितल्याचा दावा केला. १४ सप्टेंबरला गैरसमज झाल्याचे त्याने सांगितले. तसेच आयसीसीने याप्रकरणी चौकशी करण्याची तयारी दर्शवली असल्याचेही म्हटले आहे.