इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तान क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफ्रिवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिले आहे.
भारत – पाकिस्तान सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. ही जबाबदारी अंपायरची होती. असे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संबधित अंपायरवर कारवाई करा अशी मागणी केली होती. या संबधी पाकिस्तानने आयसीसीली दोन पत्रही लिहले.
पण, कारवाई झाली. त्यामुळे पाकिस्तानने आयसीसीच्या भूमिकेविरोधात आशिया चषकातून माघार घेण्याचा निर्णय़ घेतला. आज बुधवारी रात्री ८ वाजता यूएई विरुध्द पाकिस्तान संघाचा सामना होता. परंतु हा सामना न खेळण्याचा निर्णय़ पाकिस्तानने घेतला आहे.