इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव करत मोठा विजय मिळवला. पाकिस्तानच्या संघाने विजयासाठी १२८ धावांचे आव्हान दिले होते. ते टीम इंडियाने ३ विकेटस गमावत १५.५ ओव्हरमध्येच पूर्ण करुन १३१ धावा केल्या.
या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. पण, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर २९ ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १२७ धावाच त्यांना करता आल्या. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहान याने ४० धावा केल्या. तर शाहिन आफ्रिदी याने नाबाद ३३ रन्स केले. इतर फलंदाजांना मात्र फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. टीम इंडिच्या कुलदीप यादव याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या. तर हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्थी या जोडीने प्रत्येकी १-१ विकेट मिळवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला.
टीम इंडियाच्या समोर १२८ धावांचे आव्हान होते. ते फक्त १५.५ ओव्हरमध्येच पूर्ण केले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने २२ धावांची भागीदारी केली. शुबमन गिल स्टंपिंग आऊट झाला. शुबमनने १० धावा केल्या. त्यानंतर अभिषेक आणि कॅप्टन सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी १९ धावा जोडल्या. अभिषेक फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाला. अभिषेकने १३ बॉलमध्ये ३१ रन्स केले.
आशिया कपमध्ये टीम इंडियाने या सलग दुसऱ्या विजयासह सुपर ४ मध्ये धडक दिली आहे. नियमानुसार, सुपर ४ साठी २ सामने जिंकणं आवश्यक होते. त्यानुसार भारताने २ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने आपले स्थान निश्चित केलं आहे.
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सुर्यकुमार यादव यांनी पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करुन इच्छितो. ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. या सामन्यात भारतीय संघाने पाकीस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोन न करता त्यांना धडा शिकवला.