मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. अबूधाबी येथे पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झाला. भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला दुबईत युएई संघाशी झाला. त्यानंतर आज १४ तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे. पण, हा सामना रद्द होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरु आहे.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा सामना भारतीय संघाने खेळू नये अशी मागणी होत आहे. बीसीसीआयने हा सामना खेळण्याची परवाणगी दिली असली तरी सुध्दा भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळू नये असे अनेक नेत्यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे काही तास शिल्लक असतांना भारतीय संघ या सामन्यावर बहिष्कार टाकणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान देशात सर्वत्र होणा-या विरोधामुळे आजच्या सामन्यामध्ये खेळाव की नाही अशा संभ्रम अनेक खेळाडूंच्या मनात आहे. कोच गौतम गंभीरसह सर्व स्टाफ याबाबत चर्चा करत आहे. दरम्यान या सामन्यात व्यावसायिक राहून मॅचकडे बघण्याचा सल्ला खेळाडूंना देण्यात आला आहे.
येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.