इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया चषक२०२२चा थरार आजपासून सुरू होत आहे. या चषकाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. टी-20 सामने असणाऱ्या आशिया चषकामध्ये विशेष आकर्षण आहे ते भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना. हा सामना उद्या रविवारी (२८ ऑगस्ट) होत आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, “प्रतीक्षा अखेर संपली आहे, कारण आशियाई वर्चस्वाची लढाई 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. यंदाचा हा 15 वा आशिया चषक आहे. ICC T20 विश्वचषकापूर्वी एक आदर्श तयारी म्हणून. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1550452900719382528?s=20&t=XpmrNlideU1OaTm3JqhadQ
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यासह एक संघ आशिया चषक 2022 मध्ये पात्रता फेरीतून भाग घेणार आहेत. आशिया चषकाचा हा मोसम श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयोजित केला आहे, परंतु ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल. ACC ने या स्पर्धेसाठी दुबई आणि शारजाहची निवड केली आहे, जिथे अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने 16 दिवसात खेळवले जाणार आहेत.
https://twitter.com/JayShah/status/1554422925393924096?s=20&t=5quddsJVSV5ssbtkl3nx9g
भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये पाकिस्तानशी होईल, तर भारताचा दुसरा सामना क्वालिफायर संघाशी होईल. हा सामना 31 ऑगस्ट रोजी दुबईत होणार आहे. भारताला गट फेरीत फक्त दोन सामने खेळायचे आहेत. भारताच्या गटात पाकिस्तान आणि आणखी एक संघ आहे, तर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका दुसऱ्या गटात आहेत.
आशिया चषक 2022चे पूर्ण वेळापत्रक असे
पहिला सामना – 27 ऑगस्ट – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – दुबई
दुसरा सामना – 28 ऑगस्ट – भारत विरुद्ध पाकिस्तान – दुबई
तिसरा सामना – 30 ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – शारजा
चौथा सामना – ३१ ऑगस्ट – क्वालिफायर विरुद्ध भारत – दुबई
पाचवा सामना – 1 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – दुबई
6 वा सामना – 2 सप्टेंबर – क्वालिफायर विरुद्ध पाकिस्तान – शारजा
सामना 7 – 3 सप्टेंबर – B1 विरुद्ध B2 – शारजाह
सामना 8 – 4 सप्टेंबर – A1 वि A2 – दुबई
सामना 9 – 6 सप्टेंबर – A1 विरुद्ध B1 – दुबई
सामना 10 – 7 सप्टेंबर – A2 विरुद्ध B2 – दुबई
11 वा सामना – 8 सप्टेंबर – A1 विरुद्ध B2 – दुबई
सामना 12 – 9 सप्टेंबर – B1 वि A2 – दुबई
अंतिम सामना – 11 सप्टेंबर – 1ला सुपर 4 विरुद्ध दुसरा सुपर 4 संघ – दुबई
Asia Cup 2022 Schedule Declare India Vs Pakistan Match Cricket