इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिकेट हा खेळ केवळ भारतीय नव्हे तर जगभरातील अनेक नागरिकांचा आवडता खेळ आहे सहाजिकच राष्ट्रीय असो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेट स्पर्धांमध्ये नेहमीच रंगतदार सामने होतात. विशेषतः भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा सामना कोण जिंकणार याची सर्वांनाच उत्सुकता असते. आणि आज आशिया चषकामध्ये हे प्रतिस्पर्धी संघ आज एकमेकासमोर असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतवासियांचे लक्ष आजच्या सामन्याकडे लागले आहे.
आशिया चषकाला प्रारंभ झाला आहे. आज दुसरा सामना होत असून तो भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात होत आहे. हा सामना कोण जिंकणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. भारतीय संघ हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला मोठी डिमांड आहे. इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील तिकीटांचा काळाबाजार झाल्याची मोठी चर्चा आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्याचे एक तिकिट लाखाच्या घरात ब्लॅकने विकले गेल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज आहे.
१९८४ मध्ये सुरू झालेली ही स्पर्धा २०१४पर्यंत ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली गेली. २०१६मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषकही ट्वेंटी-२०त खेळवण्यात आला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावले होते.
सन २०१८मध्ये पुन्हा वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषक झाला आणि तेव्हाही भारताने बाजी मारली. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत भारताने सर्वाधिक ७ जेतेपदं पटकावली आहेत. पाच जेतेपदांसह श्रीलंका दुसऱ्या आणि दोन विजयासह पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची हाईप असताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे. गांगुली म्हणाले की, मी या स्पर्धेकडे फक्त आशिया चषक म्हणून पाहत आहे, मी त्याकडे इंडिया विरुद्ध पाकिस्तान असे पाहत नाही. भारतीय संघानेही तेच करावे, अशी माझी इच्छा आहे. मी जेव्हा क्रिकेट खेळायचो, तेव्हा माझ्यासाठी पाकिस्तानविरुद्धची लढत ही अन्य लढतींप्रमाणेच होती. मी नेहमी स्पर्धा जिंकण्याचा विचार करायचो. आताचा संघ तगडा आहे आणि त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मालिकांमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश सिंह. खान.
राखीव खेळाडू
श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर
Asia Cup 2022 India Vs Pakistan Cricket Match
BCCI Sourav Ganguly