मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. युएई या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी होणार असून अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली आहे. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातही सामना पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
आशिया चषक मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान सलामीच्या लढतीत भिडतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला दुबईत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 15 ऑगस्टपासून म्हणजेच आजपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ACC ने लिहिलंय की, ‘आशिया कप 2022 च्या तिकिटांची विक्री 15 ऑगस्टपासून सुरू होईल.’ यासोबतच ACC ने ऑनलाईन प्लॅटफॉर्मची माहिती देखील शेअर केली त्याद्वारे चाहते आशिया कपसाठी तिकिटे खरेदी करू शकतात.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत. तर पात्रता सामने ओमानमध्ये UAE, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात खेळले जाणार आहेत. हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे. आशिया चषक स्पर्धा ही यावर्षी श्रीलंकेत होणार होती. परंतु तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळे आयोजन समितीनं स्पर्धा हलविण्याचा निर्णय घेतला. UAE ला. याबाबत एसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती पाहता एसीसीने विस्तृत विचारविमर्षानंतर सर्वानुमते असा निष्कर्ष काढला आहे की ही स्पर्धा श्रीलंकेतून यूएईला हलवणे योग्य ठरेल.
आशिया चषकापूर्वी भारतीय संघ 18 ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळत नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही ६ महिन्यांनी संघात परतणार आहे. भारत आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंकेचा संघ 5 वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्ताननं 2 वेळा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. भारताने 4 वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.
आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत आशिया खंडातील पाच संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल. तसेच एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) च्या बैठकीत सन 2024 पर्यंत जय शाह हे ACC चे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. ACC च्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की ACC अध्यक्ष म्हणून जय शाह यांचा कार्यकाळ 2024 पर्यंत वाढवण्यात यावा.
आशिया चषक 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होता, परंतु त्यानंतर कोरोना महामारीमुळे तो एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही. त्यामुळे पुढील वर्षीही आशिया चषक स्पर्धा होणार आहे. त्याचे आयोजन पाकिस्तान करणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) हा निर्णय घेतला आहे. 2023 विश्वचषक पाहता, 2023 आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये असेल.
Asia Cup 2022 India Pakistan Cricket Match 27 August