इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संपूर्ण जगाचे लक्ष असून असलेला आशिया चषक हा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, या चषकापूर्वीच काही संघांचे दिग्गज खेळाडू बाहेर राहणार असल्याचे समोर आले आहे. तहे दिग्गज खेळाडू कोणते आहेत, त्याचा फायदा कुणाला अधिक होणार आहे, कोणत्या संघाचे मोठे नुकसान होणार आहे यासह अन्य बाबींची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
श्रीलंका संघातील दुष्मंथा चमिरा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चमीराची श्रीलंकेच्या संघात निवड झाली होती, मात्र सरावा दरम्यान पायाला दुखापत झाल्यामुळे तो बाहेर पडला होता. साहजिकच या बड्या वेगवान गोलंदाजांना वगळल्यामुळे आशिया चषक स्पर्धेचा उत्साह थोडा कमी झाला आहे.
तसेच जसप्रीत बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर स्पर्धेची आणि विशेषत: भारत-पाकिस्तान सामन्याची चमक काहीशी कमी झाली. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या दुखापतीमुळे त्याचे आणखी नुकसान झाले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडला होता.
गतवर्षी विश्वचषकात भारताला पराभूत करण्यात आफ्रिदीची महत्त्वाची भूमिका होती आणि अशा परिस्थितीत टीम इंडियाकडून त्याच्याविरुद्ध दमदार कामगिरीची अपेक्षा सर्वांना होती आशिया चषक 2022 ची सर्वाधिक उत्सुकता आणि चर्चा 28 ऑगस्ट रोजी होणार्या भारत-पाकिस्तान लढतीचा विजेता कोण होणार याचीच सुरू होती.
विशेषत: गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात भारताचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर या सामन्याची अधिक प्रतीक्षा होती. मात्र आता खेळाडूंच्या दुखापतीची चर्चा होत आहे. तेही जेव्हा स्पर्धेतील तीन सर्वात मोठ्या संघांनी त्यांचे तीन प्रमुख वेगवान गोलंदाज गमावले.
त्यातच हर्षल पटेलच्या दुखापतीमुळे भारताला आणखी एक धक्का बसला आहे. हर्षलची या स्पर्धेसाठी निवड होणे निश्चित होते कारण त्याने T20 मध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून विशेष ठसा उमटवला आहे आणि त्याने हे काम गेल्या वर्षी UAE मध्ये चांगले केले होते.
सीसीआयने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. यासह बोर्डाने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीची घोषणा केली, ज्यामुळे भारतीय संघ आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले आहे.
Asia Cup 2022 Big Players Out from Tournament
Cricket Srilanka India Pakistan