इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने साडे चार षटकांमध्ये यूएईच्या संघाचा ९ विकेट्सने पराभव करत विजय मिळवत सलामी दिली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी यूएईला ५७ धावांवर रोखले. त्यामुळे या सामन्यात फक्त ५८ धावांचे आव्हान मिळाले. भारताने हे विजयी आव्हान झटपट पूर्ण केले. अवघ्या २७ बॉलमध्ये १ विकेटच्या मोबदल्यात ६० रन्स केले. अभिषेकने बॅटिंगने भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर उपकर्णधार शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या जोडीने उर्वरित धावा केल्या.
या सामन्यात कर्णधार सूर्याने टॉस जिंकून यूएईला बॅटिंग दिली. यूएईच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली. अलिशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम या जोडीने २६ रन्सची पार्टनरशीप केली. मात्र जसप्रीत बुमराह याने कडक यॉर्कर टाकत ही जोडी फोडली. बुमराहने शराफू याने २२ धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यूएईला झटपट धक्के देत गुंडाळले. कुलदीप यादव याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या त्यातील ३ विकेट्स एकाच ओव्हरमध्ये होत्या. शिवम दुबे याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. भारताने अशाप्रकारे यूएईचं १३.१ ओव्हरमध्ये ५७ रन्सवर पूर्ण संघाला आऊट केले.
त्यानंतर शुबमन आणि अभिषेक या सलामी जोडीने जोरदार केली. अभिषेकने चौफेर फटकेबाजी करत ३० रन करुन आऊट झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. अभिषेकनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्याने पहिल्याच बॉलवर सिक्स ठोकला. त्यानंतर एकेरी धाव घेतली. तर शुबमन गिल यानेही फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचं योगदान दिलं. सूर्याने २ बॉलमध्ये नॉट आऊट ७ रन्स केल्या. तर शुबमनने ९ चेंडूत १ षटकार आणि २ चौकारांसह नाबाद २० धावा केल्या.