इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल.
भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएई संघाशी तर येत्या १४ तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे. येत्या २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि बांगलादेश यांचा समावेश आहे.
