नाशिक – येथील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांपैकी गोरक्ष कोलगे याने नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. या सर्व गुणवंतांचा समारंभपूर्वक गौरव अशोका स्कुलच्या सभागृहात करण्यात आला.
याप्रसंगी अशोका एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ल, प्राचार्य रेणुका जोशी, अमिताभ गर्ग हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आपला खडतर शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विद्यार्थ्यांनी कुठल्याही अपयशाला घाबरून न जाता जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आपले ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवावी. आपल्याला जो विषय आवडतो त्यामध्ये आपलं कौशल्य आणि आपली बुद्धिमत्ता वापरून आपले इप्सित ध्येय पूर्ण करावे असे सचिन पाटील यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अशोकामध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक वर्ग मध्ये विद्यार्थी शिकत असतानाच त्यालाआयआयटी आणि जे या सारख्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांच्या ओळख करून दिली जाते. त्यासाठी चॅम्पियन अकॅडमी च्या माध्यमातून अशोकाच्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक धडे सुरुवातीलाच मिळतात त्यामुळेच अशोकाच्या विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स यासारख्या परीक्षांमध्ये चमकतात.यावेळी श्रीकांत शुक्ल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले अशोकामधून जेईईच्या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रँकिंग मिळवावे यासाठी ‘सुपर-30’च्या योजनेचा मानस आहे. यांतर्गत 30 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना परीक्षेसाठी तयार केले जाईल.
असे आहेत गुणवंत विद्यार्थी
गोरक्ष कोलगे याने Mains परीक्षेत 99.86%ile मिळवत AIR 779 क्रमांक प्राप्त केला तसेच यश लाहोटी याने Mains परीक्षेत 99.25%ile मिळवत AIR 1114 आणि हर्ष सकट याने Mains परीक्षेत 93.35%ile मिळवत AIR 1420 क्रमांक मिळवला. अशोका युनिव्हर्सल स्कुल चे इतर विद्यार्थी सोनाली पाटील (99.31%ile Mains) विनीत शिंदे (97.51%ile Mains) आणि उन्मेष भोळे (97.33%ile Mains) यांनी सुद्धा दैदिप्यमान यश प्राप्त केले.
कोरोना संकटात सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर हे उत्तुंग यश प्राप्त केले. अशोका युनिव्हर्सल स्कुल चे विद्यार्थी , संचालक , शिक्षक तसेच Champions अकादमी च्या शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थांनी संस्था व शिक्षकांप्रती त्यांनी घेतलेल्या मेहेनती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
गोरक्ष कोलगे याचा पोलीस अधीक्षक सचिन पाटील , एज्युकेशन फाउंडेशनचे सचिव श्रीकांत शुक्ल, प्राचार्य रेणुका जोशी,यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गोरक्ष कोलगे याने Mains परीक्षेत 99.86%ile मिळवत AIR 779 क्रमांक प्राप्त केला तसेच यश लाहोटी याने Mains परीक्षेत 99.25%ile मिळवत AIR 1114 आणि हर्ष सकट याने Mains परीक्षेत 93.35%ile मिळवत AIR 1420 क्रमांक मिळवला. अशोका युनिव्हर्सल स्कुल चे इतर विद्यार्थी सोनाली पाटील (99.31%ile Mains) विनीत शिंदे (97.51%ile Mains) आणि उन्मेष भोळे (97.33%ile Mains)