नाशिक – अशोका हॉस्पिटलने थेट उत्पादकाकडून रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केले आहे. कायद्याने त्यांना मुभा आहे. पण, सद्यस्थितीत रेमडेसिविरचा निर्माण झालेला तुटवडा विचारात घेता रुग्ण संख्येपेक्षा अव्यावहारिक रित्या जास्तीचा साठा थेट उत्पादकाकडून प्राप्त करून घेणेसुद्धा अभिप्रेत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त साठ्या संदर्भात आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना लिखित स्वरूपात आज दिल्या.
—–
जिल्हाधिकारी यांनी केल्या या सुचना
औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 मधील शेडूल के प्रमाणे हॉस्पिटलला थेट उत्पादकांकडून औषध खरेदी करण्याची मुभा अन्न व औषध प्रशासनाने दिलेली आहे. त्या तरतुदीनुसार नाशिक मधील अशोका हॉस्पिटल ने थेट उत्पादकाकडून खरेदी केली असल्याचे दिसून आले आहे. खरेदीची मुभा जरी दिली असली तरीसुद्धा सद्यस्थितीत रेमडेसिविरचा निर्माण झालेला तुटवडा विचारात घेता रुग्ण संख्येपेक्षा अव्यावहारिक रित्या जास्तीचा साठा थेट उत्पादकाकडून प्राप्त करून घेणेसुद्धा अभिप्रेत नाही. त्या अतिरिक्त साठ्या संदर्भात आपत्कालीन परिस्थिती विचारात घेता आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना लिखित स्वरूपात आज दिल्या आहेत.
त्याचबरोबर उत्पादक कंपनीशी सुद्धा संपर्क करून त्यांनी कोणत्याही हॉस्पिटलना यापुढे अवाजवी पुरवठा करु नये अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत जेणेकरून केंद्रीय पद्धतीने वाटपासाठी अधिक कोटा जिल्ह्याला उपलब्ध राहील. नाशिक जिल्ह्यात आपण थेट हॉस्पिटल ला कोटा वाटप करण्याची सुरू केलेली कार्यपद्धती परिणामकारक ठरत असून त्यामुळे उपलब्धतेच्या प्रमाणात, अत्यवस्थ रुग्णांना औषध पोहोचवणे आपल्याला शक्य होऊ लागले आहे. या संपूर्ण कार्यवाहीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रीय कंट्रोल रूम द्वारे संपूर्ण नियंत्रण केले जाणार आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक