नाशिक – नाशिकमधील अग्रगण्य शिक्षणसंस्था अशोका एज्युकेशन फाउंडेशनच्या अशोका कॉलेजच्या विद्यार्थांनी गुणवत्ता यादीतील पहिले पाचही क्रमांक घेऊन इतिहास रचत नवीन रेकॉर्ड केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या बीबीए कोर्सच्या २०२० च्या परीक्षेतील गुणवत्ता यादीत पहिले पाचही विद्यार्थी अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्युटर स्टडीज (एसीबीसीएस) या महाविद्यालयातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार विद्यापाठाअंर्तगत बीबीए शाखेत असे प्रथमच घडलेले आहे. नाशिकच्या शिक्षणक्षेत्रासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. विद्यापीठातर्फे जाहीर होणाऱ्या पहिल्या १० विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता क्रमवारीत अशोकाचे सात विद्यार्थी आहेत. त्यात कु. मुजेन कोकणी हि विद्यापीठात बीबीए या कोर्समध्ये अव्वल स्थानावर आहे. तर कु. तेजल धिमन द्वितीय व कु. नित्यप्रिया कलियथ तृतीय स्थानावर आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या एप्रिल / मे परीक्षेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घोषित केल्यानुसार २०१७-२०२० बॅचच्या बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) च्या ७ विद्यार्थिनींनी प्रथम दहा क्रमांकाच्या यादीमध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे, गुणवत्तेतील प्रथम ५ विद्यार्थीनी अनुक्रमे एसीबीसीएसच्या आहेत .
गुणवत्ताधारकांची यादी :
कु मुजैन कोकणी पहिली रँक (युनिव्हर्सिटी टॉपर) 87.38%
कु. तेजल धिमन व्दितीय क्रमांक 87.21%
कु. नित्यप्रिया कलियथ तिसरा क्रमांक 86.75%
कु भूमि आनंद चौथा क्रमांक 86.33%
कु.वैभावी घोडके पाचवा क्रमांक 86.29%
कु. आयुषी शर्मा नववा क्रमांक 84.83%
कु. करुणा पाटील दहावा क्रमांक 84.46%
अशोकाच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजाच्या सर्व थरातून लोकांकडून त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक होत आहे. अशोका एज्युकेशन्स फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष अशोकजी कटारिया, सचिवश्रीकांत शुक्ला, संचालक (उच्चशिक्षण) डॉ.डी.एम. गुजराथी, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे , प्राचार्या डॉ.हर्षा पाटील, बी.बी.ए. शाखा उपप्राचार्य लोकेश सुराणा, बी.बी.ए-सी.ए, उपप्राचार्या श्रीमती.प्रतिमा भालेकर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर या सर्वानी यशस्वी विद्यार्थिनींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
मोठे बक्षिस जाहिर
अशोका एज्युकेशन फाऊंडेशनचे संचालक आशिष कटारिया यांनी टॉपर विद्यार्थ्यांसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. मुझेन कोकणी या विद्यार्थ्याला एमबीएच्या प्रवेशात तब्बल १ लाख रुपयांची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे. तसेच, अन्य टॉपर विद्यार्थ्यांना ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. तर, बीबीए अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना तब्बल १५ हजार रुपयांचे बक्षिस या महिन्याच्या पगारात दिले जाणार आहे.
“अशोका” हे नाव गुणवत्तेसाठी म्हणून अग्रगण्य
अशोका एज्युकेशन फाउंडेशन (एईएफ) संस्थेबाबत येथील प्रशासनाने सांगितले की, प्रत्येक क्षेत्रात सध्या “अशोका” हे नाव गुणवत्तेसाठी म्हणून अग्रगण्य आहे. अशोका ही नाशिकमधील एक प्रमुख शैक्षणिक संस्था गेल्या दोन दशकांपासून शिक्षणाच्या क्षेत्रात एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आली आहे. अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असे बालवाडी ते पदवी (केजी ते पीजी ) पर्यंतचे शिक्षण देणारी अग्रगण्य शिक्षणसंस्था आहे . अशोकाच्या उच्च शिक्षण शाखेत बीबीए, बीबीए (सीए), बीएससी (सीएस), बीकॉम, एमएससी (सीए), बीएबीएड, बीएससीबीएड, बीएड, एमए (शिक्षणशास्त्र) आणि एमबीए असे अभ्यासक्रम आहेत. एसीबीसीएस हे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ संलग्नित, नॅकमान्यताप्राप्त आणि आयएसओ 9001: 2015 प्रमाणित आहे. एज्युकेशन वर्ल्डच्या वतीने २०२१-२२ ह्या वर्षातील पहिल्या १०० स्वायत्त महाविद्यालयांपैकी एसीबीसीएस महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आले आहे. हा अशोका कॉलेजच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. दरवर्षी एसीबीसीएसचे विद्यार्थी अभ्यासात आणि प्लेसमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतात. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये करोना साथीच्या रोगाने देशात थैमान घातलेले असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी दाखविली होती.