नाशिक – अशोका एजुकेशन फाउंडेशन अंतर्गत कार्यरत असणाऱ्या चारही महाविद्यालयांत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी या हेतूने विविध उपक्रम राबवले जातात. कुशल व्यावसायिक बनण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशैली रुजावी या दृष्टीने या वर्षी “स्टुडन्ट रिसर्च प्रोजेक्ट कॉम्पिटिशन” हि संशोधन आधारित अभिनव स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अशोक ग्रुप अंतर्गत कार्यरत असणाऱ्या चारही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्यांना समाजातील विविध ज्वलंत समस्या डोळ्यासमोर ठेवून संशोधनास प्रवृत्त केले गेले.
“संशोधनाची दिशा हि समाजाभिमुख असली पाहिजे हा धागा धरून अशोका तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात चारही महाविद्यालये मिळून एकूण ६५ प्रकल्प राबवण्यात आले. या संशोधनातून विद्यार्थांमध्ये सामाजिक भान, तार्किक विचारशैली, संशोधन वृत्ती अशा विविध कौशल्यांचा अंगीकार झाल्याने समाधान आहे. हि स्पर्धा अशोका संस्थेतर्फे दरवर्षी राबवली जाणार” असल्याचे संस्थेचे संचालक व हा अभिनव उपक्रम ज्यांनी आमलात आणला त्या डॉ. डी. एम. गुजराथी यांनी सांगितले .
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा राणे नगर येथील अशोका बिझनेस स्कुल या एमबीए महाविद्यालयात संपन्न झाला. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. आपल्या भाषणातून त्यांनी अशोकातर्फे सुरु करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण तसेच संशोधनाभिमुख उपक्रमाचे कौतुक करतानाच आपल्या संशोधन काळातील अनेक उदाहरणे दिली. देशहित तसेच समाजातील समस्या सोडवण्यासाठी नवीन पिढीला संशोधनाची गरज आहे . येणाऱ्या काळात संशोधन हाच सर्व प्रगतीचा पाया असणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अशोका ग्रुपचे चेअरमन श्री. अशोक कटारिया यांनी युवकांसाठी उद्योग जगतातच नव्हे तर इतर सर्वच क्षेत्रात संशोधन हाच भविष्यातील विकासाची नांदी ठरू शकेल असे मत मांडले.
यावेळी केटीएचम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड हेदेखील उपस्थित होते. नवीन शिक्षण पद्धतीत संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले . याप्रसंगी अशोका संस्थेचे सचिव श्री. श्रीकांत शुक्ल, प्रशासक डॉ. नरेंद्र तेलरांधे, कॉर्पोरेट कंसल्टंट डॉ. सी. एम. द्विवेदी व या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून ज्यांनी काम पहिले असे डॉ. सुनील जोशी व डॉ. संध्या खेडेकर व सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.
स्पर्धेत अशोका बिझनेस स्कुल मधून शिवानी सोनार व ऋतुजा तिडके यांनी प्रथम, मूझेन कोकणी, उमेकुलसुम शेख, समृद्धी लद्धड, ऐश्वर्या पाटील यांनी द्वितीय तर साहिल पाटील, लुबेना राजा, अनिशा गायकवाड, मृण्मयी साळवे, गौरी खैरनार यांनी तृतीय पारितोषिक पटकावले. अशोका बीबीए/बीसीए महाविद्यालयातुन अलिझा शेख हिने प्रथम, निधी अग्रवाल, रिद्धी कलंत्री यांनी द्वितीय, निखिल कुमार, सकीना मुल्ला, मिताली गुप्ता यांनी तृतीय पारितोषिक मिळवले, अशोका संलग्न बीएड महाविद्यालयातुन नाझ शेख हिने प्रथम, समीक्षा शेलार हिने द्वितीय, मंजिरी पैठणकर हिने तृतीय पारितोषिक पटकावले. त्या सोबतच रिसर्च पेपरमध्ये, नेहा देवांगे प्रथम, साक्षी कटपाल द्वितीय तर मॅगडेलिन पारके हिने तृतीय पारितोषिक मिळवले. अशोका बीएड महाविद्यालयातून निकिता कुकडेजा व प्रियांका बाविस्कर या विद्यार्थ्यांनी प्रथम, सदाफ खान, अर्चना देबनाथ, सारिका कुमारी यांनी द्वितीय तर कल्याणी ब्राह्मणकर, कल्याणी पाटील, अर्चना मोहन, रेणुका देशपांडे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.
या स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ सरिता ढवळे यांनी काम केले तर चारही महाविद्यालयातील डॉ. वैभव भालेराव, डॉ. प्रीती सोनार, डॉ. मनीषा शिरसाठ व डॉ. रेखा पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सिमरन आनंद, रिया चावला, नमराह खान या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन प्रा. पूजा घोलप यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. परमेश्वर बिरादार यांनी मानले. या संपूर्ण स्पर्धेत संशोधन वृत्ती वृद्धिंगत होण्यासोबतच इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या अशी भावना सर्व स्पर्धंकांनी व्यक्त केली.