नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका बिल़्डकॉन या प्रख्यात इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने बांधलेल्या दोन महामार्गांची यशकथा आज सर्वांसमोर उलगडणार आहे. डिस्कव्हरी या टीव्ही चॅनलवर बिल्ड इंडिया या नावाची मालिका प्रसारित केली जात आहे. यात भारतामध्ये निर्मित करण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे.
याच मालिकेमध्ये आज, गुरुवार, ५ जानेवारी देशातील काही बांधकाम प्रकल्पांची निर्मिती प्रदर्शित केली जाणार आहे. संध्याकाळी ७.१० वाजता ही मालिका प्रसारीत होणार आहे. त्यात अशोका बिल्डकॉनने निर्मिती केलेल्या द बुंदेलखंड एक्सप्रेसवे आणि द ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे या दोन प्रकल्पांची यशोगाथा दाखविली जाणार आहे. चार पदरी असलेला बुंदेलखंड एक्सप्रेसवे अतिशय विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आला आहे. १४ हजार ७१६ कोटी रुपये खर्चून हा हायवे साकारण्यात आला आहे. यातील ४९ किलोमीटरच्या हायवेचे काम अशोका बिल्डकॉनने निर्धारित कालावधीच्या आतच पूर्ण केले आहे.
तर, राजधानी दिल्लीच्या परिघात असलेला द ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे याच्या निर्मितीचाही अशोकाने विक्रम केला आहे. हा हायवे बांधण्यासाठी अशोका बिल्डकॉनला ९०० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, अशोकाने अवघ्या ४८० दिवसातच हा हायवे साकारला आहे. हे दोन्ही हायवे कसे साकारले गेले याचा संपूर्ण उलगडा डिस्कव्हरी चॅनलवरील आजच्या मालिकेमध्ये होणार आहे. आज हे भाग प्रदर्शित होत असल्याने अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया आणि व्हाईस चेअरमन सतीश पारख यांनी अतिशय आनंद व्यक्त केला आहे. तसेच, अशोकाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. अतिशय मेहनती आणि प्रामाणिक टीममुळेच हे यश मिळाल्याचे कटारिया आणि पारख यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/kannothsubhash1/status/1603293630944665600?s=20&t=mvGfGjj_cfxZ8V31jCd9FQ
Ashoka Buildcon Highway Success Story on Discovery Channel
Build India