नाशिक – सामाजिक कार्यातून दशभरातील लोकांना जोडण्यात योगदान दिल्याबददल अशोका बिल्डकॉनला सामाजिक कारणाद्वारे सार्वजनिक संपर्क निर्माण करण्यात उत्कृष्टता ( Excellence in Building Public Connect through Social Cause) हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला. अशोका रस्ता सुरक्षा कॅम्पेन या मोहिमेतून केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मोहिमेच्या माध्यमातून अशोका बिल्डकॉन लिमिटेड ने 2 दशलक्षाहून अधिक शालेय विद्यार्थी, चालक आणि 22 राज्यांमधील सामान्य नागरिक यांच्या पर्यंत पोहचत रस्ता सुरक्षेचे प्रशिक्षण व संबंधित उपक्रम राबविले आहे.
याच कामासाठी देशभरातील अनेक सामाजिक संस्था तसेच राज्य सरकार यांच्याकडून देखील अशोका बिल्डकॉनचा गौरव करण्यात आलेला आहे. अशोकाच्या देशभरातील टोल प्लाझावर सुरक्षा प्रोत्साहन स्मृतिचिन्हांचे वितरण करून संपूर्ण भारत देशात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठीचा संदेश प्रसारित केला. स्थानिक पोलीस व प्रशासन यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सुरक्षा संबंधित कार्यक्रम साजरे केले. अशोकाचे प्रकल्प सुरु असणाऱ्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना गती शोध यंत्र देऊन सहकार्य करण्यात आले. हेल्मटचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. सोशल मीडिया , होर्डिंग्स, बॅनर, वृत्तपत्र यांच्या माध्यमातून नेहमीच रस्ता सुरक्षाचे महत्व सांगितले.
कामाची पावती पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली
अशोकाने मागील १० वर्षात देशभरात रस्ता सुरक्षा या क्षेत्रात केलेल्या कामाची पावती या पुरस्काराच्या माध्यमातून मिळाली आहे. सामाजिक जाणीव ठेवत आपण असे उपक्रम सातत्यपूर्ण करत असतो आणि हे करत असताना जेव्हा समाजातील प्रतिष्टीत संस्थेच्यावतीने अशी कौतुकाची थाप पडते तेव्हा नक्कीच काम करण्यासाठी अजून ऊर्जा मिळते. अशोका रस्ता सुरक्षा कॅम्पेनच्या माध्यमातून देशभरातील लोकांची जनजागृती करण्यासाठी आम्ही आमचे योगदान देणे सुरूच
ठेवणार आहोत.
व्योम श्रीवास्तव, प्रमुख, कॉर्पोरेट कमूनिकेशन सेल