नाशिक – अशोका मेडीकोवर हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडोरने यकृत प्रत्यारोपण केले. सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे ब्रेन डेड पेशंटच्या अवयव दान करण्याचे ठरले. अवयव संध्याकाळी ७:३३ निघून लगेच ७:४८ ला अशोका मेडिकोवर हॉस्पिटलला पोहोचले. अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे ZTCC च्या नोंदीनुसार एका पेशंटला हे यकृत मिळाले. येथील डॉक्टरांचा टीमने हे अवयव आता प्रत्यारोपण चालू केले आहे. सदरचे ऑपरेशन हे रात्रभर चालण्याची शक्यता आहे. डॉ तुषार संकलेचा, डॉ जी बी सिंघ यांच्या देखरेखखाली डॉक्टांराची टीम काम करत आहे. अमोल दुगजे यांनी ऑर्गन ट्रान्सप्लांट co-ordinator म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.
डॉ सुशील पारख, सचिन बोरसे, रितेश कुमार, डॉ सागर पालवे यांच्या प्रयत्नातून येथे या सुविधा देण्यात येत असल्याचे अशोका मेडीकोअरच्या व्यवस्थापनाने सांगितले.